तुळजापूर: शारदीय नवरात्र महोत्सवात सोमवारी दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली.

तत्पूर्वी काल रात्री सातव्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात अश्व वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.