मुंबई : सगळेच प्रेक्षक बिग बाॅस मराठीची वाट पहात असतात. बहुचर्चित आणि वादग्रस्त असा हा शो दणक्यात सुरू झाला आहे. शोचं ब्रिदवाक्य ऑल इज वेल असलं, तरीही सुरुवात काही फारशी वेल म्हणजे चांगली झालेली नाही. कुणा राडा घातला, कुणा आकांडतांडव केला तर कुणी रडलं.

बिग बॉसमध्ये ओव्हरअॅक्टिंग, खऱ्या आयुष्यात काय? अपूर्वाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील

बिग बॉस मराठीच्या घरात काल १६ सदस्यांची एंट्री झाली. १०० दिवस आपल्या माणसांशिवाय, कुठल्याही करमणुकीच्या साधनांशिवाय राहायचं म्हणजे सोपं नाही. या घरात क्षणोक्षणी आपल्या जवळच्या व्यक्तीची आठवण येणं सहाजिकच आहे. आज किरण माने, योगेश जाधव आणि विकास सावंत या तिघांमध्ये चर्चा रंगताना दिसणार आहे. त्या चर्चेदरम्यान विकास असं काही सांगून गेला ज्यामुळे योगेशला अश्रू अनावर झाले.

योगेश जाधव

योगेश जाधवनं किरण माने आणि विकासबरोबर आपलं मन खुलं केलं. आपल्या मनातलं दु:ख त्यानं शेवटी बोलून दाखवलंच. तो म्हणाला, ‘आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत. आपण स्पेशल आहोत. महादेवाने आपल्याला ही अॅबिलिटी दिली आहे याचा फायदा आपण करून घ्यायचा.’ विकास पुढे म्हणाला, ‘बिग बॉसमध्ये आपण आलो म्हणजे आपण खास आहोत.’

Bigg Boss Marathi 4: अरे मी काय म्हातारा आहे का, किरण माने स्पर्धकावर भडकलेच

किरण माने त्यावर म्हणाले, ‘काही जणांना त्यांचा संघर्ष बघून बोलावलं आहे.’ विकास म्हणाला, ‘काल सामान भरताना मला माझी आई आठवली.’ हे ऐकून योगेशला त्याचा आईची आठवण आली आणि त्याला रडू कोसळलं. या घरात प्रत्येकाला आपल्या माणसाची आठवण येते. पण घरातले सदस्यच एकमेकांचा आधार बनतात. त्यांचं मनोबळ वाढवतात, त्यांना धीर देतात.

बिग बॉस यांनी जाहीर केल्यानुसार, प्रत्येक गटात चार स्पर्धक आहेत. या चारही स्पर्धकांनी त्यांच्या गटातला कोणता खेळाडू निरुपयोगी आहे हे ठरवायचं आहे. यावेळी त्रिशूल मराठेने किरण माने यांचं नाव घेतलं. यावर स्पष्टीकरण देताना तो म्हणाला की, आपल्या गटात सर्व तरुण आहेत. फक्त किरणच वयाने मोठे आहेत. यावर भडकत किरण म्हणाले की, ‘मी काही म्हातारा नाही.’ तर अपूर्वाने प्रसादचं नावं घेतलं, ती असं देखील म्हणाली की, ‘मी इथे कोणाची मनं जपायला आली नाहीये.’ आता स्पर्धक कोणत्या खेळाडूला निरुपयोगी ठरवणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here