नवी दिल्ली : संपूर्ण भारतात ज्या थाटात गणेशोत्सव, दिवाळी असे सण साजरे केले जातात. तसचं भारतात नवरात्रोत्सवसुद्धा अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो. नवरात्र म्हटलं की आपल्यासमोर बऱ्याच गोष्टी येतात. ९ दिवस निर्जळी उपवास करणारे लोक, अनवाणी फिरणारी लोकं, ९ दिवस ९ रंगाचे कपडे परिधान करुन सेलिब्रेशन करणारी लोकं.

गेल्या वर्षी तर करोनामुळे कोणताच सण साजरा करता आला नव्हता त्यामानाने यावर्षी बऱ्यापैकी सूट मिळाली असली तर सार्वजनिक ठिकाणी गरबा खेळण्यास अजूनही परवानगी नाही. खासगी सोसायटी किंवा आवारात गरबा खेळल्या जात आहेत. पण मोठमोठ्या शहरांमध्ये भल्या मोठ्या पटांगणावर खेळला जाणाऱ्या गरब्याचं स्वरुप सध्या बघायला मिळत नाहीये.

शिंदे गटातील आमदार फडणवीसांसोबत मेळाव्याला, गळ्यात भाजपचा गमछा
मुळात नवरात्रोत्सात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात सकाळी प्रचंड उष्ण हवामान आणि रात्रीची हलकी थंडी अशा वातावरणामुळे एकंदरच एक सुखद वातावरण तयार झालेलं असते. याच दरम्यान, बरेच तरुण तरुणी नटून सजून गरबा खेळायला एका ठिकाणी एकत्रित येतात, एकमेकांसोबत मनसोक्त गरबा खेळतात आणि वेळ घालवतात आणि याच मोकळ्या वातावरणात मनावरचा तसेच शारीरिक ताण हलका होतो आणि याच दरम्यान बरीचशी जोडपी आपसूकच कॅज्यूअल सेक्सला प्राधान्य देतात. या काळात बऱ्याचशा घरातून मुलामुलींना थोडीफार सूट, मोकळीक देण्यात येते म्हणून तर बराच तरुण वर्ग या सणाची आतुरतेने वाट बघत असतो की, या निमित्ताने आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत शारिरीक जवळीक निर्माण करता येईल. आपल्या देशात सेक्स याकडे ते टॅबू म्हणून बघितलं जातं.

काही तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, वातावरणातील बदलामुळे होणारे हारमोनल बदल आणि रात्रभर बाहेर भटकण्यासाठी घरातून मिळणारी सूट ही यामागची २ मुख्य कारणे आहेत. फक्त कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्याच नव्हे तर गुदरातमध्ये या ९ दिवसात प्रायव्हेट डिटेक्टिवलासुद्धा चांगलीच मागणी असते. आपली मुलं किंवा मुली जेव्हा गरबा खेळण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यावर नजर ठेवायला प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नेमले जातात असं देखील या रिपोर्टमध्ये म्हंटलं आहे.

नवरात्रीच्या उत्साहाला गालबोट; गरबा खेळताना प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here