मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून काँग्रेसचा ‘हात’ धरलेले माजी आमदार राम पंडागळे (Ram Pandagale) यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. पंडागळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला. राम पंडागळे यांनी विधानपरिषदही गाजवली आहे. ते अनुसूचित जमातीचे बडे नेते असून राज्यात त्यांचे अनेक समर्थक आहेत. त्यामुळे शिंदे गटाचं पारडं जड झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

राम पंडागळे सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट २०१४ मध्ये त्यांनी ‘घड्याळ’ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीने आपल्याला मालाड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. पण आपण ती त्यांना साभार परत करणार आहोत, असं त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर साडेचार वर्ष त्यांनी शिवसेनेसोबत घालवली. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी त्यांनी ठाकरेंनाही ‘जय महाराष्ट्र’ केले.

Ram Pandagale 630

राम पंडागळे

सप्टेंबर २०१८ मध्ये पंडागळे यांनी मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस प्रवेश करताच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. तसंच राहुल गांधींना पंतप्रधान पदासाठी त्यांनी पाठिंबा दिला होता. तसंच भाजपने मागासवर्गीयांवर अन्याय-अत्याचार केल्याचा आरोपही पंडागळेंनी त्यावेळी केला होता. मात्र तीनच वर्षात ते काँग्रेसलाही कंटाळल्याचे दिसते. पंडागळेंनी काँग्रेसचा ‘हात’ सत्ताधारी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवारीत भाजपची कुरघोडी, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

राम पंडागळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी शिंदे गटात प्रवेश केला. ‘ते दलित, शोषित समाजाचे नेते आहेत. त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काळात अनेक जणांनी आम्हाला समर्थन दर्शवलंय. तसंच रामभाऊंनीही पाठिंबा दिला’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंडागळेंच्या पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली.

हेही वाचा : शिंदे गटातील आमदार फडणवीसांसोबत मेळाव्याला, गळ्यात भाजपचा गमछा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here