दरम्यान, ४ ते २३ ऑक्टोबर हुबळी दादर एक्स्प्रेस ही देखील मिरज, कुर्डूवाडी, दौंड या मार्गे धावेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दिवाळीच्या आधी ‘बुकिंग फुल्ल’
दिवाळी काही दिवसांवर आल्यामुळे नागरिकांकडून सुट्टीचे नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे; पण पुण्यातून सुटणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्याचे बुकिंग ‘फुल’ झाल्यामुळे गावी कसे जायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. रेल्वे बोर्डाकडे पुण्यातून राज्याच्या विविध भागांत दिवाळीसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
पुणे शहर व परिसरात नोकरीनिमित्ताने राज्यातील विविध भागांतील नागरिक आले आहेत; तसंच पुण्याला ‘विद्येचे माहेरघर’, ‘आयटी हब’ म्हणूनदेखील ओळखले जाते. त्यामुळे पुण्यात राज्याच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठी आहे. हे विद्यार्थी दिवाळीत १० ते १५ दिवस सुट्टी घेऊन गावी जात असतात. त्यामुळे पुणे येथून सुट्टीच्या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.