जम्मू : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यादरम्यान एक मोठी घटना समोर आली आहे. जम्मू काश्मीरचे कारागृह विभागाचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत ते आढळले. हेमंत लोहिया यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तर त्यांचा नोकर बेपत्ता आहे. त्यामुळे त्याच्यावर खुनाचा संशय बळावत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेहाचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर नोकराचा शोधही सुरू करण्यात आला आहे. हेमंत हे जम्मूच्या बाहेरील उदयवाला इथे राहत होते. या ठिकाणी त्याचा मृतदेह घरात आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. हेमंत लोहिया यांची हत्या का आणि कोणी केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दसरा मेळाव्यासाठी गर्दीची स्पर्धा; ठाकरे – शिंदे गटांकडून हजारो एसटी, खासगी बसेसचे बुकिंग
ऑगस्टमध्ये झाली होती नियुक्ती…

भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी एचके लोहिया यांची दोन महिन्यांपूर्वी जम्मू आणि काश्मीरच्या तुरुंग विभागाचे नवे पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिस आणि प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मूमध्ये पोहोचले असताना हा सर्व प्रकार झाला. या घटनेनंतर सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

पूजा घातली तरी लग्न झालं नाही, बाप-लेकांकडून पुजाऱ्याला बेदम मारहाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here