ratnagiri live news in marathi, बेपत्ता महिलेचा अखेर लागला शोध, किल्ल्यात कपल पॉइंट खाली २०० फूट खोल दरीत आढळले शव – missing woman found dead in 200 feet deep valley below couple point in fort
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील बेपत्ता झालेल्या तन्वी घाणेकर (33, रा. खालचा फगरवठार, रत्नागिरी) या विवाहितेचा मृतदेह भगवती किल्ल्यासमोरील कपल पॉइंट खाली २०० फूट खोल दरीत मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की घातपात याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वी २९ सप्टेंबर रोजी त्या बेपत्ता झाल्या होत्या. रत्नागिरी शहरातील खालचा फगरवठार येथून बेपत्ता झालेल्या विवाहितेचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला? याचा शोध शहर पोलिसांनी सुरू केला आहे. अमित शहांच्या दौऱ्यावेळी मोठी घटना, जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालकाची राहत्या घरी हत्या
सायंकाळी उशिरापर्यंत माउंटेनिअर्स असोसिएशनच्या पथकाच्या मदतीने तिचा मृतदेह रॅपलिंगच्या सहाय्याने दरीतून बाहेर काढण्यात आला आहे दरम्यान घातपताच्या शक्यतेने या प्रकरणी दोन संशयीतांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. रितेश घाणेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली होती.
यानूसार, गुरुवार २९ सप्टेंबर रोजी त्यांची पत्नी तन्वी घाणेकर (३३, रा. खालचा फगरवठार, रत्नागिरी) ही रोजी सायंकाळी ७.१५ वा. सुमारास मुलगी आनंदी हिला, मी बाजारात जावून येते… उशिर झाला तर जेवण करुन घ्या, असे सांगून दुचाकी (एमएच ०८ एक्स ७२२६) वरुन बाजारात गेली होती. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ती घरी न आल्याने पती रितेशने ३० सप्टेंबरला शहर पोलीस ठाण्यात खबर दिली होती. याप्रकरणी अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.