जयपूर: राजस्थानच्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून लिफ्ट शाफ्टमध्ये पडल्यानं २० वर्षांच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा तरुण उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर तो कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

मूळचा उत्तर प्रदेशच्या वाराणसीचा रहिवासी असणारा कुशाग्र मिश्रा त्याच्या मित्रांसोबत माय हवेली अपार्टमेंटच्या ११ व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये राहायचा. रविवारी रात्री त्यानं लिफ्टचं बटण दाबलं. दरवाजा उघडला. पण लिफ्ट अकराव्या मजल्यावर आली नव्हती.
हृदयद्रावक! गरबा खेळताना तरुणाला हार्ट अटॅक; नाचता नाचता जमिनीवर कोसळला, मृत्यूनं गाठलं
बटण दाबलेलं असतानाही लिफ्ट अकराव्या मजल्यावर आली नव्हती. मात्र कुशाग्रचं लक्ष नव्हतं. दरवाजा उघडला गेल्यानं त्यानं पाय पुढे टाकला आणि तो लिफ्ट शाफ्टमध्ये पडला. तो मणिपाल विद्यापीठात कॉम्प्युटर सायन्स शिकत होता. कुशाग्रच्या मृत्यूची माहिती सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना दिली. रहिवाशांनी यासाठी विकासकाच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरलं आहे.

कुशाग्रचा मृत्यू शाफ्टमध्ये पडल्यानं झाल्याचं युभांगरोटा पोलीस ठाण्याचे प्रभारी रविंद्र प्रताप यांनी सांगितलं. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. कुशाग्रच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.
VIDEO: कोब्राची सुटका केल्यावर शायनिंग; तरुण करू लागला किस, मिळालं ‘रिटर्न गिफ्ट’ अन् मग…
अशाच प्रकारची घटना जूनमध्ये पालीच्या आंबेडकर सर्किलमध्ये घडली होती. त्यावेळी एका इलेक्ट्रॉनिक शोरुममध्ये तार तुटल्यानं लिफ्ट अचानक ३५ फूट खाली कोसळली. त्यात एका सेल्समनचा मृत्यू झाला होता आणि दोन जण जखमी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here