youth died while dancing garba: गुजरातच्या सूरतमध्ये घरात गरबा खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. एक दाम्पत्य त्यांच्या फ्लॅटमध्ये मोबाईलवर गाणी लावून गरबा खेळत होतं. त्यादरम्यान तरुणाला अचानक भोवळ आली. तो बेशुद्ध होऊन कोसळला.

 

surat yoth dies
सूरत: गुजरातच्या सूरतमध्ये घरात गरबा खेळताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. एक दाम्पत्य त्यांच्या फ्लॅटमध्ये मोबाईलवर गाणी लावून गरबा खेळत होतं. त्यादरम्यान तरुणाला अचानक भोवळ आली. तो बेशुद्ध होऊन कोसळला. शेजाऱ्यांच्या मदतीनं पत्नीनं त्याला रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

सूरत लिंबायत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आकार रेसिडन्सीमध्ये वास्तव्यास असलेल्या दीपक पाटील (३४) यांचा गरबा खेळताना मृत्यू झाला. दीपक पाटील हे मूळचे मालेगावचे आहेत. पत्नी देविकासोबत ते सूरतला वास्तव्यास होते. हिऱ्यांच्या कंपनीत ते कामाला होते.
बटण दाबलं, दार उघडलं, पण लिफ्ट आली नाही; ११ व्या मजल्यावरून पडून तरुणाचा करुण अंत
३० सप्टेंबरच्या रात्री दीपक पत्नीसोबत मित्राच्या कुटुंबासोबत गरबा खेळण्यासाठी जाणार होते. मात्र मित्राच्या घरी पाहुणे आल्यानं त्यांना हा प्लान रद्द करावा लागला. त्यामुळे दीपक आणि देविकानं आपल्या फ्लॅटच्या हॉलमध्ये गरबा खेळायचं ठरवलं. मोबाईलवर गाणी लावून दोघांनी ठेका धरला. गरबा खेळता खेळता देविका थकल्या. त्या एका जागी बसल्या. मात्र दीपक गरबा खेळत होते. रात्री १० च्या सुमारास दीपक यांना भोवळ आली. ते बेशुद्ध होऊन पडले.
हृदयद्रावक! गरबा खेळताना तरुणाला हार्ट अटॅक; नाचता नाचता जमिनीवर कोसळला, मृत्यूनं गाठलं
देविका यांनी तातडीनं शेजाऱ्यांच्या मदतीनं दीपक यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दीपक आणि वेदिका यांचा विवाह ४ वर्षांपूर्वी झाला होता. दीपक यांच्या अकाली एक्झिटमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. दीपक यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल रविंद्र करत आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here