Maharashtra Politics | सभेतील भाषणं योग्य भाषेत होणं अपेक्षित आहे. भाषण हे खुसखुशीतही करता येतं. कोणाची अवमानकारक वक्तव्य त्यात नसावीत. काही चुकीची वक्तव्य झाली तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दसरा मेळाव्याच्या सुरक्षाव्यवस्थेकडे पुरेपूर लक्ष पुरविले आहे. दोन्ही दसरा मेळावे अत्यंत व्यवस्थित पार पडतील.

हायलाइट्स:
- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणांची प्रचंड उत्सुकता
- महाराष्ट्रातील राजकीय हवा तापली
मात्र, राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दसरा मेळाव्याच्या सुरक्षाव्यवस्थेकडे पुरेपूर लक्ष पुरविले आहे. दोन्ही दसरा मेळावे अत्यंत व्यवस्थित पार पडतील. कायदा आणि सुव्यवस्थेचं कठोर पालन केले जाईल. मात्र, सध्या जी परिस्थिती आहे, त्याकडे कोणीही दुर्लक्ष करून चालणार नाही. देशविघातक कृत्य करणाऱ्या कोणीही या गर्दीचा गैरफायदा घेऊ नये. अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. सभेतील भाषणं योग्य भाषेत होणं अपेक्षित आहे. भाषण हे खुसखुशीतही करता येतं. कोणाची अवमानकारक वक्तव्य त्यात नसावीत. काही चुकीची वक्तव्य झाली तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ठाकरे व शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याची अहमहमिका सुरू असून, वाहनांमधून अधिकाधिक कार्यकर्त्यांना मुंबईत घेऊन येण्याची स्पर्धा सुरू आहे. लहान-मोठ्या अशा एकूण दहा हजार वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार आहेत. यामध्ये सहा हजार एसटी तसेच खासगी बसगाड्यांचा समावेश आहे. इतिहासात प्रथमच शिवसेनेच्या दोन गटांच्या स्वतंत्र सभा होणार असल्याने गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे.
दसरा मेळाव्यासाठी शरद पवारांचा सल्ला?
शिवसेना पक्षाची दोन शकलं झाल्यामुळे दोन्ही गटांमध्ये स्पर्धा आणि संघर्ष होणे स्वाभाविक आहे. पण हे सर्व करताना एक मर्यादा कायम ठेवा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना आणि शिंदे गटाला दिला. एका पक्षाचे दोन भाग झाल्यामुळे ही स्पर्धा सुरु झाली आहे. दसरा मेळावा (Dasara Melava) त्या सगळ्याचं सूत्र म्हणून स्वीकारला गेला आहे. गंमत म्हणजे अशा गोष्टी होतात, यात काही नवीन नाही. संघर्ष होतो पण त्याला मर्यादा असली पाहिजे. ती मर्यादा सोडून काही झाले तर ते चांगलं नाही. अशी परिस्थिती टाळण्यासाठी माझ्यासकट राज्यातील जबाबदार नेत्यांनी वातावरण नीट करण्यासाठी पावले टाकली पाहिजेत, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.