Pratap Sarnaik News: ‘राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २२ नोव्हेंबर २०१६च्या अधिसूचनेद्वारे मौजे भाईंदरपाडा येथील सुमारे ३७ हजार चौ.मी. जमीन विविध धर्मियांसाठी संयुक्त स्मशानभूमी व दफनभूमी आणि स्मृती उद्यानाकरिता राखीव केली. त्यानंतर ठाणे महापालिकेने २० मार्च २०१७ रोजी ठराव केला.

‘राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २२ नोव्हेंबर २०१६च्या अधिसूचनेद्वारे मौजे भाईंदरपाडा येथील सुमारे ३७ हजार चौ.मी. जमीन विविध धर्मियांसाठी संयुक्त स्मशानभूमी व दफनभूमी आणि स्मृती उद्यानाकरिता राखीव केली. त्यानंतर ठाणे महापालिकेने २० मार्च २०१७ रोजी ठराव केला. तरीही त्या एकूण जमिनीतील तीन हजार चौ.मी. जमीन ठरल्याप्रमाणे ख्रिस्ती धर्मियांसाठी दफनभूमी म्हणून अद्याप देण्यात आलेली नाही. आम्ही अलीकडेच त्या जागेची पाहणी करण्यासाठी गेलो असता आम्हाला धक्काच बसला. कारण याच संपूर्ण जमिनीवर प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपकडून विहंग मरिना हा भव्य निवासी प्रकल्प आखण्यात आल्याचे पहायला मिळाले’, असे अॅड. सुनीता यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. त्यानंतर प्रकल्प राबवत असलेल्या संबंधितांना प्रतिवादी करण्याची व या आरोपांचे मुद्दे याचिकेत समाविष्ट करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना देऊन खंडपीठाने याप्रश्नी पुढील सुनावणी १० नोव्हेंबरला ठेवली. याचिकाकर्त्यांकडून याचिकेची सुधारित प्रत मिळाल्यानंतर संबंधित प्रतिवादींना तीन आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करता येईल, असेही खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.