मुंबई : चांगल्या जागतिक संकेतांच्या दरम्यान, आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी खरेदी होत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक जोरदार तेजीत दिसत आहेत. आज भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज जबरदस्त तेजीने झाली असून सेन्सेक्स १००० हून अधिक अंकांच्या उसळीने उघडला आहे. निफ्टीमध्येही २५० हून अधिक अंकांच्या जोरावर व्यवहार सुरू झाले आहेत.

गुंतवणूकदारांना पुन्हा सुगीचे दिवस; ऑक्टोबरमध्ये ५ कंपन्या एक्स-डिव्हिडंड देणार, वाचा सविस्तर
सुरुवातीला बाजाराची स्थिती
पहिल्या १५ मिनिटांत बाजाराची स्थिती पाहिली तर सेन्सेक्स ११००० अंकांनी म्हणजेच १.९४ टक्क्यांनी वाढून ५७,८८९ वर आला. दुसरीकडे, निफ्टी ३२१.७० अंकांनी किंवा १.९ टक्क्यांनी वाढून १७,२०९ वर पोहोचला आहे.

कसा खुलला बाजार
आज शेअर बाजाराची सुरुवात धमाक्याने झाली असून बीएसई सेन्सेक्स ७१७.८४ अंकांच्या किंवा १.२६ टक्क्यांच्या उसळीसह ५७,५०६ वर उघडला आहे. तसेच NSE चा निफ्टी २६०.१० अंकांच्या किंवा १.५४ टक्क्यांच्या उसळीसह १७,१४७ वर उघडला. सेन्सेक्सचे सर्व ३० समभाग हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. इंडसइंड बँक, लि., टाटा स्टील, बजाज फायनान्स, अॅक्सिस बँक, एसबीआय, एचडीएफसी, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक यांनी बाजारात सुरुवातीला फायदा नोंदवला आहे.

गुंतवणुकीसाठी पैसे ठेवा तयार! या आठवड्यात नवीन IPO घेऊन येतोय कमाईची संधी
प्री-ओपनिंगमध्ये व्यवसाय
आज, बाजाराच्या पूर्व सुरुवातीच्या काळात शेअर बाजारात जबरदस्त वाढ पाहायला मिळत आहे आणि सेन्सेक्स ५५० अंकांनी तर निफ्टी २०० अंकांपेक्षा जास्त व्यवहार करत होता. प्री-ओपनमध्ये सेन्सेक्समध्ये ५५० अंकांच्या वाढीसह ५७,३३९ ची पातळी दिसून आली. दुसरीकडे, निफ्टी २१३ अंकांनी १७,१०० वर चढताना दिसला.

दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज, ‘ही’ कंपनी एका शेअरवर देणार ५ शेअर्स
आज कोणत्या शेअर्समध्ये तेजी
आज सेन्सेक्सचे सर्व ३० समभाग उसळी घेऊन व्यवहार करत आहेत. इंडसइंड बँकेने ४.९० टक्क्यांनी उसळी घेतली तर बजाज फायनान्स ३.६० टक्क्यांनी वाढला आहे. L&T २.९२ टक्क्यांनी व एसबीआय २.८४ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. अॅक्सिस बँक २.७३ टक्क्यांनी व आयसीआयसीआय बँक २.७ टक्क्यांनी मजबूत सुरुवात केली आहे. दुसरीकडे निफ्टीचे सर्व ५० समभाग वाढीच्या हिरव्या चिन्हांसह व्यवहार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here