Maharashtra Politics | सुधाकर सुर्वे आणि आणि विलास पोतनीस यांनी वरुण सरदेसाईंना सिद्धेश कदम अजूनही युवासेनेच्या कार्यकारिणीत कसे राहिले, असा जाब विचारला. यावर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी यावर लवकरच निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून घेऊ असे उत्तर दिले. हे उत्तर एकूण उपस्थित विभाग प्रमुख चांगलेच भडकले. त्यामुळे बैठकीच्या सुरुवातीलाच मोठा वाद झाला.

हायलाइट्स:
- वरुण सरदेसाईंना विचारला जाब
- सुधाकर सुर्वे आणि आमदार विलास पोतनीस आक्रमक
दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. तेव्हा हा प्रसंग घडला. सुधाकर सुर्वे आणि आणि विलास पोतनीस यांनी वरुण सरदेसाईंना सिद्धेश कदम अजूनही युवासेनेच्या कार्यकारिणीत कसे राहिले, असा जाब विचारला. यावर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी यावर लवकरच निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून घेऊ असे उत्तर दिले. हे उत्तर एकूण उपस्थित विभाग प्रमुख चांगलेच भडकले. त्यामुळे बैठकीच्या सुरुवातीलाच मोठा वाद झाला. यानंतर इतर नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे हा वाद तात्पुरता शमला. मात्र, आगामी काळात शिवसेना पक्षात या वादाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी खासदार विनायक राऊत आणि अनिल देसाई यांनी सुर्वे आणि पोतनीस यांची बाजू उचलून धरली. त्यामुळे युवासेनेचे वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण निरुत्तर झाले होते.
गेल्या काही दिवसांमध्ये रामदास कदम यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक स्वरुपाची टीका केली होती. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांनी कोणताही मुलाहिजा बाळगला नव्हता. त्यामुळे शिवसैनिक रामदास कदम यांच्यावर चांगलेच संतापले होते. तरीही रामदास कदम यांचे सुपुत्र युवासेनेच्या कार्यकारिणीत कसे राहू शकतात, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.