पुणे : नारायणपूर इथे दर्शनासाठी निघालेल्या चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने चार पलटी खात हा अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. यात तीन मुलींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

या अपघातात रचित मोहता वय १८ वर्षे, रा. कलकत्ता, पश्चिम बंगाल, २. गौरव लालवानी वय १९ वर्षे, रा रायपूर, छत्तिसगढ़ यांचा मृत्यू झाला असून इतर पाच जणांना पुढील उपचारसाठी पुण्यातील ससुन रूग्णायल येथे दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

बेपत्ता महिलेचा अखेर लागला शोध, किल्ल्यात कपल पॉइंट खाली २०० फूट खोल दरीत आढळले शव
अपघात मृत झालेले विद्यार्थी हे विविध राज्यातील असून ते पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून जखमींना रुग्णालयात दाखल केले.

नारायणपूर येथील सासवड – कापूरहोळ रस्त्यावरील दत्त मंदिराशेजारी एका धोकादायक वळणावर हा भीषण अपघात झाला आहे. पोलिसांकडून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असून वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांना गाडीने धडक देत चार पलटी खात हा अपघात झाला आहे. यात वाहनाचा चक्काचूर झाला असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

विमानतळावर तरुणाची चेकिंग केली पण काही सापडलं नाही, अखेर अंडरवेअरमध्ये तपासलं असता पोलीस चक्रावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here