मुंबई : महागाई नियंत्रित करण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने (RBI) सप्टेंबरच्या अखेरीस जारी केलेल्या द्वि-मासिक पतधोरणात रेपो दरात ०.५० टक्क्यांनी वाढ केली. रेपो दर आता ५.९० टक्के झाला आहे. रेपो दरात ही सलग चौथी वाढ आहे. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यामुळे गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्जाचा हप्ता वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर बँकांनीही कर्जे महाग करण्यास सुरुवात केली आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसीसह अनेक बँकांनी कर्जाचे दर वाढवले आहेत. तुम्ही एसबीआयचे (SBI) ग्राहक असाल आणि तुम्ही २० वर्षांसाठी ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले असेल, तर व्याजदर वाढल्यानंतर तुमच्या कर्जाचा हप्ता (EMI) किती वाढेल.

ग्राहकांना दिलासा…! ‘या’ बँकेने मुदत ठेवींवर व्याजदर वाढवले; तुमचंही यात खातं आहे का?
एसबीआयने एक्सटर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट (EBLR) आणि रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) अर्ध्या टक्क्यांनी वाढवला आहे. एसबीआयच्या वेबसाइटवरील नवीन गृहकर्ज व्याजदरांच्या माहितीनुसार १ ऑक्टोबरपासून किमान कर्जदर ८.५५ टक्क्यांवर गेला आहे.

हप्ते कसे वाढतील ते लक्षात घ्या
मागील हप्ते (EMI)

कर्जाची रक्कम: ३० लाख रुपये
कर्जाचा कालावधी: २० वर्षे
व्याज दर: ८.०५ टक्के
हप्ता (EMI): २५,१८७ रुपये
एकूण कार्यकाळावरील व्याज: ३,०४४,७९३ रुपये
एकूण पेमेंट: ६,०४४,७९३ रुपये

भाड्यावर दिलेल्या व्यावसायिक मालमत्तेवरही भरावा लागतो कर, जाणून घ्या काय आहे नियम
दर वाढीनंतर हप्ता (EMI)
कर्जाची रक्कम: ३० लाख रुपये
कर्जाचा कालावधी: २० वर्षे
व्याज दर: ८.५५ टक्के
हप्ता (EMI): २६,१३० रुपये
एकूण कार्यकाळावरील व्याज: ३,२७१,१३१ रुपये
एकूण पेमेंट: ६,२७१,१३१ रुपये

(टीप: ही गणना एसबीआय होम लोन EMI कॅल्क्युलेटरवर आधारित आहे.)

कर्जदारांची झोप उडणार! SBI सह बँकांचा ग्राहकांना ‘जोर का झटका’, व्याजदरांत पुन्हा मोठी वाढ
व्याजात किती वाढ?
व्याजदरात ०.५० टक्के वाढ केल्यास तुमच्या कर्जाचा हप्ता (EMI) ९४३ रुपयांनी वाढेल. तसेच आता तुमच्या गृहकर्जाचे व्याजदर पुढील २० वर्षांसाठी स्थिर राहिल्यास तुम्हाला आता संपूर्ण कार्यकाळासाठी २,२६,३३८ रुपये अधिक व्याज द्यावे लागेल. एसबीआय (SBI) सह बहुतांश बँका क्रेडिट स्कोअर लिंक्ड कर्जे देत आहेत. ज्याचा व्याजदर ८.५५ टक्के आहे. याचा अर्थ ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितके त्याच्यासाठी गृहकर्ज स्वस्त होईल.

महागाईमुळे मध्यवर्ती बँकांकडून व्याजदर वाढ
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, आता बँकांचे गृहकर्ज मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR) आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) शी जोडले गेले आहेत. कोरोना महामारीनंतर जगभरात महागाई झपाट्याने वाढली आहे. युरोप, अमेरिकेसह सर्वच देश कमालीच्या महागाईने त्रस्त आहेत. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँका आक्रमकपणे व्याजदर वाढवत आहेत. भारतात, रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून रेपो दरात १.९० टक्क्यांनी वाढ केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here