Maharashtra Politics | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात होणार आहे. १४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे या सात दिवसांमध्ये निवडणूक आयोग हा शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत महत्त्वाचा निर्णय देणार का, हे पाहावे लागेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा, याचा फैसला झाल्यास अंधेरी पोटनिवडणुकीची राजकीय समीकरणे ३६० अंशांमध्ये बदलू शकतात.

हायलाइट्स:
- शिंदे गटाचे नेते सध्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत आहेत
- शिंदे गटाच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत
या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. शिंदे गटाचे नेते सध्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे कोणते महत्त्वाचे पुरावे सादर केले जाणार, हे पाहावे लागेल. त्यानंतर निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निकाल देणार, हे पाहावे लागेल.
३ नोव्हेंबरला मतदान, ६ नोव्हेंबर रोजी निकाल
निवडणूक आयोगाकडून सोमवारी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १४ ऑक्टोबरपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. त्यानंतर ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व मतदारसंघात मतदान होईल. तर ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
शिंदे गटाची कोंडी
या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आले नसले तरी दोन्ही बाजूंचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. शिवसेनेकडून रमेश लटके यांची पत्नी ऋजुता लटके तर भाजपकडून मुरजी पटेल यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. सध्या शिंदे गटाकडून शिवसेना पक्षावर हक्क सांगितला जात असला तरी अधिकृतरित्या त्यांना पक्षाचा ताबा मिळालेला नाही. आजही शिवसेना पक्षाचा अधिकृत AB Form देण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडेच अबाधित आहे. तसेच शिंदे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची म्हटली तरी त्यांच्याकडे कोणतेही पक्षचिन्ह नाही. त्यामुळे ‘आम्हीच खरी शिवसेना’ असे ठासून सांगणाऱ्या शिंदे गटाला भाजपच्या मुरजी पटेल यांना पाठिंबा देण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.