uttar pradesh accident: उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारचा टायर फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं. अनियंत्रित कार आधी दुभाजकाला आदळली. त्यानंतर तिनं एका बुलडोझरला धडक दिली. कोरिया गावाजवळ हा अपघात झाला. त्यात बँक ऑफ इंडियाच्या उपव्यवस्थापकाचा मृत्यू झाला आहे.

कमलेश चालवत असलेल्या कारचा वेग अतिशय जास्त होता. त्यामुळे अपघातानंतर कारचं मोठं नुकसान झालं. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस अपघातस्थळी पोहोचले. कारमध्ये अडकलेल्या कमलेश कुमार यांना कार कटरनं कापून बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे दाखल करण्यापूर्वीच कमलेश यांनी अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
कोरिया गावाजवळ अल्टो कारला अपघात झाल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अनिल कुमार यांनी दिली. शाहजहापूरहून हरदोईला जात असलेल्या भरधाव कारचा टायर फुटला. त्यामुळे कारला अपघात झाला. या कारमधून बँक ऑफ इंडियाचे उपव्यवस्थापक कमलेश कुमार प्रवास करत होते. अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं अनिल कुमार यांनी सांगितलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.