नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant ) आज (४ ऑक्टोबर) त्याचा २५वा वाढदिवस साजरा करत आहे. पंतला वाढदिवसानिमित्त अनेक जण शुभेच्छा देत आहेत. पंत दिल्या जाणाऱ्या या शुभेच्छामध्ये एका शुभेच्छांकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ऋषभ पंतची गर्लफ्रेंड ईशा नेगी(Isha Negi)ने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ईशा आणि पंत गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांनी प्रेमाची कबुली दिली आहे. अशात ईशाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याची चर्चा सुरू झाली आहे.

वाचा-हेटमायरला दणका; विमान वेळेत न पकडल्याबद्दल थेट टी-२० वर्ल्डकप संघातून केली हकालपट्टी

ईशाने पंतचे काही फोटो एकत्र करून त्याचा व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने माय लव्ह असा उल्लेख केलाय. ईशाची ही स्टोरी पाहून पंतला सर्वात आवडते असे गिफ्ट मिळाल्याची प्रतिक्रिया चाहते देत आहेत. व्हिडिओसाठी ईशाने वाढदिवसाचे एक गाणं देखील लावले आहे. सोबत हार्ट वाली इमोजी देखील आहे.

कोण आहे ईशा नेगी

पंत प्रमाणे ईशा नेगी देखील उत्तराखंडची आहे. ईशा एक इंटिरियर डिझायनर आहे. या शिवाय ती फॅशन डिझायनर देखील आहे. ईशा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते आयपीएल २०२२ मध्ये ईशा पंतला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर येत होती.

वाचा- कुस्तीचा सराव करताना पैलवानाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

गेल्या महिन्यात ईशाचा वाढदिवस होता तेव्हा पंतने तिला शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा पंतने ईशाला क्वीन म्हटले होते. पंतच्या शुभेच्छांवर उत्तर देताना आय लव्ह यू विश असे म्हटले होते.

टी-२० वर्ल्डकप

दोन आठवड्यात ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकप सुरू होत आहे. भारताची पहिली मॅच २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. वर्ल्डकप संघात पंतचा देखील समावेश आहे. सध्या तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळतोय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here