नवी दिल्ली: उद्या देशभरात दसऱ्याचा सण साजरा होणार असून आज नवरात्रीच्या नवव्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोन्याची किंमत बाजारावर अवलंबून असते. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतो, तेव्हा भारतात सोन्याचे दर प्रति ग्रॅम महाग होतात. देशात सोन्याच्या दरात दिवसेंदिवस होणारी वाढ आजही सुरूच आहे. Goodreturns वेबसाइटनुसार २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत आता ४७,३५० रुपयेवर आहे, जी सोमवारी ४६,७५० प्रति १० ग्रॅम होती. दुसरीकडे, आठ ग्रॅमच्या २२ कॅरेट सोन्याची किंमत ४०० रुपायांनीं ३७,८८० रुपये झाली आहे.

गोरगरिबांची दिवाळी यंदा गोड होणार, दीड कोटी कुटुंबाला राज्य सरकार देणार भेट
सोन्याचे दर ढगात
गेल्या एका दिवसात २४ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी वाढ झालेली दिसत आहे. मंगळवारी १० ग्रॅम सोन्याचा भाव ५५० रुपयांनी वाढून ५१,६६० रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे गुडरिटर्न्सनुसार मंगळवारी आठ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ४१,३२८ रुपये होती. सोन्याची किंमत बाजारावर अवलंबून असते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्यास भारतात सोन्याचे दर प्रति ग्रॅम महाग होतात. आंतरराष्ट्रीय घटकांमध्ये अस्थिर धोरणे, मंदावलेली आर्थिक वाढ आणि अमेरिकन डॉलरची ताकद यांच्यामुळे सध्या भारतभर सोन्याची झळाळी वाढली आहे.

सोनं खरेदीची संधी! BSE मधूनही करता येणार सोन्याचा व्यवहार, जाणून घ्या कसा घ्याल फायदा
चांदीचे दर
दरम्यान सोन्याचेच नाही तर चांदीचे भाव गेल्या एक दिवसात वाढले आहेत. आजच्या व्यवसायात चांदी MCX वर ४६३ रुपयांच्या उसळीसह व्यवहार करत आहे आणि तुम्हाला चांदीची नाणी खरेदी करण्यासाठी अधिक खर्च करावा लागेल. एमसीएक्सवर चांदीचा डिसेंबर फ्युचर्स ६१,३७४ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे आणि त्यात ४६३ रुपयांची उसळी नोंदवली जात आहे.

दिवाळीच्या तोंडावर मोठा दिलासा; खाद्य तेलाच्या बाबतीत मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला
सणासुदीचा परिणाम
सणासुदीचा परिणाम व्यवसायावर होत असून देशांतर्गत सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ होत आहे. आगामी दिवाळी सणापूर्वी करवा चौथ आणि धनत्रयोदशीच्या सणाला लोक सोन्या-चांदीचे दागिने आणि नाणी, बिस्किटांची खरेदी करतात, त्यामुळे सराफा बाजारात चमकत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here