Maharashtra Politics | दसरा मेळाव्यापूर्वी मुंबईत अनेक ठिकाणी बैठक घेतल्या होत्या. यादरम्याना बाळासाहेबांनी अनेक चाळी आणि व्यायामशाळांना भेटी दिल्या. चाळीतील अगदी लहान खोल्यांमध्येही बाळासाहेब ठाकरे बैठका घेत असत. फक्त १० ते २० लोक असले तरी बाळासाहेब त्यांच्यासमोर बोलायचे. या जनसंपर्कामुळेच त्यावेळी दादरची हिंदमाता आणि परळ येथील भारतमाता व्यायामशाळेतील तरुणांनी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी स्वत: ला झोकून दिले होते.

हायलाइट्स:
- शिवसेनेचा पहिला मेळावा दसऱ्याच्या दिवशी झाला नव्हता
- साध्या शर्ट-पँटमध्ये बाळासाहेब दसरा मेळाव्याला आले होते
- शिवाजी पार्काने पहिल्यांदाच अनुभवली अभुतपूर्व गर्दी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या या पहिल्या दसरा मेळाव्याला साधा पँट-शर्ट परिधान करुन आले होते. यावेळी त्यांच्यासोबत सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेचे काही मोजके नेते उपस्थित होते. अनेक नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना शिवाजी पार्कात सभा घेण्याऐवजी एखाद्या बंदिस्त सभागृहात सभा घ्यावी, असे सुचविले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घ्यायचे ठरवले. त्यावेळी शिवाजी पार्क मैदानाचा परिसर आतासारखाच रहिवाशी भाग होता. मैदानाच्या भोवतालच्या या भागात दोन-तीन मजल्याच्या लहान इमारती होत्या. तसेच मैदानाच्या सभोवताली रांगेने नारळाची झाडे होती. दसरा मेळाव्याच्यानिमित्ताने एरवी शांत असणाऱ्या शिवाजी पार्कच्या मैदानावर प्रचंड मोठी गर्दी जमली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणावेळी ‘सायलेन्स झोन’ असलेल्या शिवाजी पार्कात टाळ्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज दुमदुमत होता. यावेळी श्रोत्यांच्या गर्दीत महिलांची संख्याही लक्षणीय होती, अशी आठवण शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितली.
त्यावेळच्या दसरा मेळाव्याचा स्वरुप आतासारखे नव्हते. शिवसेनेच्या जन्मानंतर पक्ष विस्ताराच्यादृष्टीने घेतल्या जाणाऱ्या बैठकांचा तो एक भाग होता. या पहिल्यावहिल्या दसरा मेळाव्यापूर्वी मुंबईत अनेक ठिकाणी बैठक घेतल्या होत्या. यादरम्याना बाळासाहेबांनी अनेक चाळी आणि व्यायामशाळांना भेटी दिल्या. चाळीतील अगदी लहान खोल्यांमध्येही बाळासाहेब ठाकरे बैठका घेत असत. फक्त १० ते २० लोक असले तरी बाळासाहेब त्यांच्यासमोर बोलायचे. या जनसंपर्कामुळेच त्यावेळी दादरची हिंदमाता आणि परळ येथील भारतमाता व्यायामशाळेतील तरुणांनी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी स्वत: ला झोकून दिले होते. शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याला कोणतीही पोलीस सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. त्यावेळी गिरगाव व्यायामशाळेतील तरुणांनी या मेळाव्याला सुरक्षाव्यवस्था पुरवली होती. वेगवेगळ्या ठिकाणच्या याच व्यायामशाळा पुढे जाऊन शिवसेनेच्या शाखांच्या निर्मितीचे कारण ठरल्या, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
स्टीलच्या डब्ब्यातून जमवले होते पैसे
शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यावेळी गर्दीत एक स्टीलचा डब्बा फिरवण्यात आला होता. त्यावेळी दसरा मेळाव्याला आलेल्या लोकांनी या डब्ब्यात आपापल्या परीने शिवसेनेसाठी वर्गणी दिली होती. याच दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळही उपस्थित होते. छगन भुजबळ त्यावेळी व्हीजेटीआय महाविद्यालयात शिकत होते. जेव्हा छगन भुजबळांना दसरा मेळाव्याची माहिती मिळाली तेव्हाच त्यांनी शिवाजी पार्कला जायचे ठरवले. मी शिवाजी पार्कात गेलो तेव्हा त्याठिकाणी प्रचंड गर्दी होती. एवढा मोठा जनसमुदाय मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.