नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळणार आहे. सरकारने डीएमध्ये (महागाई भत्ता) वाढ केली असून यासोबतच आता आणखी एक भत्ता वाढविण्याचा विचार केला जात आहे. तसे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. सध्याच्या माहितीनुसार DA वाढीसोबत एचआरए (घरभत्ता) वाढीचीही घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. DA वाढीसह एचआरएमध्ये सुधारणा देखील अपेक्षित आहे.

मोठी बातमी! केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला
सरकारी कर्मचाऱ्यांना कसा HRA मिळतो
सरकारी कर्मचार्‍यांसाठी एचआरए ते काम करतात त्या शहराच्या श्रेणीनुसार निर्धारित केले जाते. या X, Y आणि Z अशा तीन श्रेणी आहेत. X श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या २७% दराने घरभत्ता मिळतो. तर Y श्रेणीला १८ ते २० टक्के दराने HRA मिळते. तसेच Z श्रेणीला ९ ते १० टक्के दराने HRA मिळते. विशेष म्हणजे हा दर क्षेत्र आणि शहरानुसार बदलतो. यापूर्वी गेल्या वर्षी जुलैमध्ये एचआरएमध्ये वाढ करण्यात आली होती. त्यावेळी डीए देखील २८ टक्के करण्यात आला होता, आता डीए ३८ टक्के झाला आहे, तर एचआरएमध्येही सुधारणा अपेक्षित आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; फिटमेंट फॅक्टरवर आला मोठा अपडेट, पाहा किमान पगार किती वाढणार
एचआरए किती वाढणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा एचआरए लवकरच ३ ते ४ टक्क्यांनी वाढू शकतो. X श्रेणीतील शहरांमधील कर्मचाऱ्यांना त्यांच्या HRA मध्ये चार टक्के वाढ मिळू शकते, तर Y श्रेणीतील शहरांमध्ये त्यांच्या भत्त्यांमध्ये ३ टक्के वाढ दिसू शकते. याशिवाय Z श्रेणीतील शहरातील कर्मचाऱ्यांचा एचआरए १ ते २ टक्क्यांनी वाढू शकतो. त्यांनाही सध्या ९ ते १० टक्के दराने घरभत्ता दिले जाते. सध्या सरकारी कर्मचार्‍यांना घरभत्ता १८ ते २० टक्क्यांपर्यंत आहे.

पेन्शनधारकांनो लक्ष द्या! तुमच्या मासिक पेन्शनमध्ये DR ची रक्कम कशी तपासायची जाणून घ्या
सरकारने महागाई भत्ता वाढवला
केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २८ सप्टेंबर रोजी ५० लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि सुमारे ६२ लाख पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) ४ टक्क्यांनी वाढवल्यास केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घोषणा केली. सरकारच्या या घोषणेने कर्मचाऱ्यांनी नवरात्रीत दिवाळी केली. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या डीएमध्ये ४ टक्के वाढ करण्यात केल्यानंतर या महिन्यापासून कर्मचाऱ्यांना आता वाढीव पगार मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here