Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 4, 2022, 3:02 PM

Dhanush and Aishwarya Divorce Update धनुष आणि ऐश्वर्या यानी लग्नाच्या १८ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. १७ जनवरीला दोघांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला.

 

dhanush and aishwarya

हायलाइट्स:

  • धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोटाचा निर्णय
  • चाहत्यांना बसला होता धक्का
  • मोठी अपडेट आली समोर
मुंबई: सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींच्या लग्न आणि घटस्फोटांच्या बातम्या काही नव्या नाहीत. पण जेव्हा एखादी आवडती जोडी नातं संपवण्याचा विचार करते, तेव्हा चाहत्यांच्या जिव्हारी लागतं. असंच काही तरी झालं होतं काही महिन्यांपूर्वी. दक्षिणेचा सुपरस्टार धनुष आणि त्याची पत्नी व सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या या जोडीनं चाहत्यांना अचानक मोठा धक्का दिला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी काडीमोड घेण्याची घोषणा केली होती. त्यामुळं तब्बल १८ वर्षांच्या दोघांच्या संसाराला ब्रेक लागला.

धनुष आणि ऐश्वर्या याच्या घटस्फोटाच्या निर्णयाची इतकी चर्चा झाली , की चाहत्यांनी त्यांना हा निर्णय मागे घ्या..अशी भावनीक साद घातली होती. पण दोघांनी त्यांचा निर्णय सोशल मीडियावर जाहिर केला होता. आता त्यांच्या घटस्फोटासंदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. चाहत्यांना सुखावणारी अशी ही अपडेट आहे, असंच म्हणावं लागेलं. धनुष आणि ऐश्वर्या यांनी त्यांचा घटस्फोटाचा निर्णय सध्या तरी थांबवला असल्याचं म्हटलं जात आहे. चाहत्यांबरोबच रजनीकांत यांना देखील धनुष आणि ऐश्वर्याला पुन्हा एकत्र पाहायचं होतं आणि यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत होते.
मल्हारला कळलाय मोनिकाचा डाव, दोघांची रंगली जुगलबंदी, हा Video नक्की पाहा
रजनीकांत यांच्या घरी धनुषच्या कुटुंबियांसोबत घटस्फोटावर चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे. कुटुंबियांसोबत बोलल्यानंतर धनुष आणि ऐश्वर्या यांनी त्यांच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचा विचार केल्याचं म्हटलं जातंय. दोघांनी निर्णय मागे घेतला नसली तरी, काही काळ पुढं ढकलल्यानं ते दोघं नक्की पुन्हा एकत्र येतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना वाटत आहे.
आदिपुरुषमध्ये देवदत्त नागेने ‘हनुमान’ साकारताना केलीये ही मोठी चूक? मध्य प्रदेशच्या मंत्र्यांचा संताप

रजनीकांत मुलीचं घर तुटण्यापासून वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहेत. धनुष आणि ऐश्वर्या विभक्त झाले तर याचा वाईट परिणाम त्यांच्या मुलांवरही होईल असं त्यांचं मत आहे. असं म्हटलं जातं की याआधीही अनेकदा रजनीकांत यांनी हे नातं वाचण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यात सुरू असणाऱ्या वादांमध्ये रजनीकांत यांनी स्वत: लक्ष घातलं होतं आणि त्यांचे वाद मिटवले होते. विशेष म्हणजे यावेळीही त्यांनी प्रयत्न सोडला नाही. त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here