लातूर : ऐन दसरा सणाच्या तोंडावर लातूर जिल्ह्यातील उदगीर जवळ बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जागीच जण ठार झाले तर एक महिला गंभीर जखमी घटना लातूर जिल्ह्यातील उदगीर जवळ घडली आहे.

आज सकाळी उदगीर आगाराची एसटी बस उदगीरहून चाकूरकडे जात होती तर स्विफ्ट कार ही तुळजापूरहून दर्शन घेऊन उदगीरकडे येत होती. दरम्यान, लोहाऱ्याजवळ येताच गुळगे मिलच्या जवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. कोणाला काही समजायच्या आत कारचा चक्काचूर झाला. तर बस चालकाच्या बाजूचा बसचा भाग कापला केला. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

साखर-तेलासह चार वस्तू अवघ्या शंभर रुपयांत, शिंदे-फडणवीस सरकारचे दिवाळी पॅकेज
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन व शहर पोलीस ठाण्याचे तसेच उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत.

मृतांची नावे

अलोक तानाजी खेडकर, रा. संत कबीर नगर,उदगीर

अमोल जीवनराव देवक्तते, रा. रावनकोळा,

कोमल व्यंकट कोदरे, रा. डोरणाळी ता मुखेड,

यशोमती जयवंत देशमुख, रा. यवतमाळ

नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार, रा. बिदर रोड, उदगीर

जखमींचे नावे

प्रियांका गजानन बनसोडे, रा. एरोळ ह. मु. गोपाळ नगर, उदगीर

कल्याणमधील प्रसिद्ध इमारतीला आग; साड्यांचा आधार घेत बाल्कनीतून उड्या मारल्या,व्हिडीओ व्हायरल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here