अयोध्या: उत्तर प्रदेशात रामलीला सादरीकरणादरम्यान पुन्हा एकदा कलाकाराला मृत्यूला गाठलं आहे. फतेहपूरमध्ये हनुमान साकारणाऱ्या कलाकाराचा मृत्यू घडल्याची घटना ताजी असताना आता अयोध्येत रामलीला सुरू असताना रावणाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं कलाकाराचा मृत्यू झाला.

अयोध्येतील रुदौलीमधील ऐहार गावात रविवारी म्हणजेच २ ऑक्टोबरला रात्री रामलीला आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर कलाकार त्यांची कला सादर करत होते. सीताहरणाचा प्रसंग सुरू होता. रावणानं मारिचाला हरिण बनवून पाठवलं आणि राम-लक्ष्मण त्याचा पाठलाग करू लागले. त्यावेळी रावणाची भूमिका साकारणारा कलाकार मंचावर आला. तो अचानक कोसळला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
भरधाव कारचा टायर फुटला, आधी दुभाजकाला धडक, मग बुलडोझरवर आदळली; डेप्युटी मॅनेजरचा मृत्यू
ऐहार गावात गेल्या ४६ वर्षांपासून नवरात्रीत रामलीला सादर केली जाते. याच गावात राहणारे पतिराम गेल्या १० वर्षांपासून रामलीला नाटिकेत रावणाची भूमिका वठवतात. या वर्षीदेखील त्यांनीच रावण साकारला होता. मात्र रामलीला सुरू असताना त्यांना मृत्यूनं गाठलं.
बटण दाबलं, दार उघडलं, पण लिफ्ट आली नाही; ११ व्या मजल्यावरून पडून तरुणाचा करुण अंत
याआधी फतेहपूर जिल्ह्यातील सलेमपूर गावात रामलीलेतील एका कलाकाराचा मृत्यू झाला. रामलीला सुरू असताना हनुमान साकारणाऱ्या कलाकारानं अखेरचा श्वास घेतला. लंका दहन सुरू असताना कलाकाराला भोवळ आली. तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. काही वेळातच त्याची प्राणज्योत मालवली. त्याचाही मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here