मुंबई : टाटा समूहाच्या हाती विक्री झाल्यानंतर २०२० मध्ये म्हणजेच जवळपास दोन वर्षांपासून बंद असलेल्या नीलाचल इस्पात निगम लिमिटेड या सरकारी कंपनीमध्ये कामकाज पुन्हा सुरु झाले आहे. एका निवेदनात टाटा समूहाने म्हटले की, ओडिशा-आधारित नीलाचल इस्पात निगम लिमिटेडने टाटा स्टीलच्या उपकंपनीने १२ हजार कोटी रुपयांत संपादन केल्यानंतर जवळपास ९० दिवसांनी कामकाज सुरू केले आहे. नीलाचल इस्पात निगम लिमिटेड ही सरकारी कंपनी टाटा स्टीलने तिच्या उपकंपनी टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स (TSLP) मार्फत अलीकडेच विकत घेतली. या वर्षी जानेवारीमध्ये १२,००० कोटी रुपयांमध्ये हा करार झाला होता.

अस्थिर बाजारात दमदार रिटर्न देणाऱ्या ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करा, दिग्गज ब्रोकरेजचा सल्ला
कंपनी ३० मार्च २०२० पासून बंद
ही कंपनी ३० मार्च २०२० पासून बंद आहे. कंपनीच्या अधिग्रहणाच्या वेळी टाटांनी ऑक्टोबरमध्ये आपले कामकाज सुरू करेल असे सांगण्यात आले. कंपनी पुढील १२ महिन्यांत स्थापित क्षमता गाठेल अशी अपेक्षा आहे. टाटा स्टील देखील NINL ची क्षमता पाच दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यासाठी पावले उचलत आहे.

शेअर्समध्ये २ टक्क्यांहून अधिक तेजी
नीलाचल इस्पात निगम लिमिटेड हे टाटा स्टीलने त्यांच्या उपकंपनी टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट्स (TSLP) द्वारे विकत घेतले आहे. जानेवारी २०२२ मध्ये १२ हजार कोटी रुपयांचा करार झाला. NINL च्या कामकाजाच्या बातम्यांनंतर टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यापारात दोन टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे. हा शेअर २ रुपयांपेक्षा जास्त वाढून १००.५० रुपयांवर पोहोचला आहे.

गुंतवणूकदारांना पुन्हा सुगीचे दिवस; ऑक्टोबरमध्ये ५ कंपन्या एक्स-डिव्हिडंड देणार, वाचा सविस्तर
टाटांची योजना काय
गेल्या पाच दिवसांबद्दल बोलायचे झाले तर शेअरमध्ये ३.६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र गेल्या एका महिन्यात हा शेअर जवळपास ६ टक्क्यांनी घसरला आहे. पण आता येत्या काही दिवसांत तो १३० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. वार्षिक दहा दशलक्ष टन क्षमतेच्या ओडिशा-आधारित स्टील प्लांटचे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर, टाटा स्टीलने म्हटले आहे की २०३० पर्यंत NINL ची क्षमता वार्षिक १० दशलक्ष टनांपर्यंत वाढवायची आहे.

दिवाळीपूर्वी गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज, ‘ही’ कंपनी एका शेअरवर देणार ५ शेअर्स
कंपनीचा व्यवसाय
१.१ दशलक्ष टन पोलाद बनवण्याची क्षमता असलेला कारखाना विविध कारणांमुळे जवळपास दोन वर्षे बंद होता. याशिवाय कंपनीचा स्वतःचा पॉवर प्लांट आहे. कंपनीकडे लोखंडाची खाण देखील आहे जी विकासाच्या टप्प्यात आहे. कंपनीकडे लोखंडाची खाण देखील आहे, जी विकासाच्या टप्प्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here