सोलापूर : सोलापूर शहरातील इंजिनिअर असलेल्या सुफीयान शेख या तरुणाने आज सकाळी आपल्या आईवर जीवघेणा हल्ला केला आहे. घरातील चाकूने तब्बल तीन वार करत त्याने आईला भोकसले. जरीना अस्लम शेख (वय ४३ वर्ष, रा. कोणतंम चौक, पूर्व मंगळवारपेठ, सोलापूर) असं मुलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आईचं नाव आहे. हल्ल्याबाबत कळताच नातेवाईकांनी ताबडतोब जखमी महिलेला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून सदर महिला अतिदक्षता विभागात मृत्युशी झुंज देत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जरीना शेख या घरात झाडू मारत होत्या. लॉकडाऊन काळात मानसिक रुग्ण झालेला मुलगा सुफीयान शेख हा त्यांच्यावर कोणत्यातरी कारणावरून चिडून होता. घरात कोणी नसल्याची संधी साधत त्याने चाकू घेतला आणि पाठीमागून येत आई जरीनावर जीवघेणा हल्ला केला. मानेवर, पाठीवर आणि कंबरेवर असे तीन वेळा सुफीयानने आईला भोकसले. आरोपी तरुण हल्ल्यानंतर थेट जेलरोड पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.

पोलिसांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरे देण्याची योजना खंडीत; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

‘सुफीयान लॉकडाऊनपासून झाला मानसिक रुग्ण’

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफीयान शेख याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं आहे. मात्र लॉकडाऊनपासून तो मानसिक आजाराने ग्रस्त होता. आईने सुफीयानला सोलापूर व पुणे येथील प्रसिद्ध अशा डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले होते. त्याच्यावर उपचार देखील सुरू होते. मात्र मानसिक त्रासात सुफीयान याने दोन ते तीन वेळा विचित्र कृत्य केले होते. घरातील इतर नातेवाईक त्याची मोठी काळजी घेत होते. मात्र घरी कोणी नसताना आज सकाळी त्याने जन्मदात्या आईवरच जीवघेणा हल्ला केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here