Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 4, 2022, 5:51 PM
Swara Bhaskar tweet on rahul gandhi वादग्रस्त वक्तव्यामुळं कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. समाजात घडणाऱ्या विविध घटनेवर स्वरा उघडपणे व्यक्त होत असते. त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

काय आहे स्वराचं ट्विट?
स्वरानं राहुल गांधी यांचा पावसातील सभेचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो शेअर करत ती लिहिते की, भन्नाट आहे फोटो, फोटोग्राफर कोण आहे? पुढं तिनं लिहिलं आहे की, सदियों रहा है दुश्मन दौर ए जमां हमारा,कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी. हाच तो क्षण! राहुल गांधी, तुमच्या दृढनिश्चयाला बळ मिळो!
स्वराचं हे ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. पण स्वरानं यापूर्वीही राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी अनेकदा ट्विट्स केले आहेत.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.