परभणी : भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात १९ वर्षीय तरुणाच्या जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना परभणीच्या पाथरी शहरातील सेलू कॉर्नर भागात घडली आहे. आनंद लक्ष्मण हिवाळे असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघातामध्ये अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाथरी शहरातील जैतापूर मोहल्ला भागात राहणारे दिपक लक्ष्मण हिवाळे, आनंद लक्ष्मण हिवाळे हे दुचाकीवरून येत होते. वाटेत त्यांची दुचाकी पाथरी-मानवत रोडवरील सेलू कॉर्नर परिसरात आली असता एका भरधाव पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये आनंद लक्ष्मण हिवाळे या १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दिपक लक्ष्मण हिवाळे हा गंभीर जखमी झाला.

लॉकडाऊनने सगळंच बदललं: इंजिनिअर मुलगाच आईच्या जीवावर उठला; मृत्यूशी झुंज सुरू

अपघाताची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी असलेल्या दिपक हिवाळे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी जखमी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, अपघातामध्ये घरातील १९ वर्षीय तरुणाच्या मृत्यूने हिवाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे पाथरी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here