याबाबत मनी ट्रान्स्फरचा व्यवसाय करणारे बजरंग निंबाळकर यांनी प्रत्यक्ष घटनेविषयी माहिती दिली. सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुकानासमोर एक रिक्षा येऊन उभी राहिली होती. त्यामधून दोन व्यक्ती उतरल्या आणि दुकानात आल्या. त्यातील प्रवाशाने गुगल पेद्वारे निंबाळकर यांच्या खात्यावर १५०० रुपये ट्रान्सफर केले. त्याबदल्यात निंबाळकर यांनी त्यांना रोख रक्कमही दिली. ही रक्कम घेऊन रिक्षाचालक निघून गेला. तो संबंधित प्रवासी मात्र तेथेच थांबला. आपण लुबडलो गेलो असल्याचे त्याच्या लक्षात आले.
त्याने संबंधित दुकानदाराला याविषयी सविस्तर माहिती सांगितली की, मी प्रवासी पद्मावती येथे रिक्षात बसलो. मला बेंगुळुरुला जायचे असल्याचे सांगितल्यावर हा रिक्षाचालक त्यांना घेऊन कात्रज येथील दत्तनगर परिसरात गेला. त्यावेळी रिक्षाचालकाचा साथीदारही रिक्षातच होता.त्यावेळी पद्मावती ते दतनगर दरम्यानच्या प्रवासाला रिक्षा चालकाने ३१०० रुपये भाडे झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्या प्रवाशाकडे असलेले १६०० रुपये रिक्षा चालकाने काढून घेतल्यावर बाकीचे पैसे रिक्षा चालक मागू लागला. त्यानंतर त्याला घेऊन निंबाळकर यांच्या दुकानावर गेले आणि तेथे १५०० रुपये उकळत हे दोघेही पसार झाले.
या घटनेने पुण्यात दिवसाढवळ्या लुबाडल्याची घटना घडल्याने पुणे कितपत सुरक्षित आहे यावरुन लक्षात येते. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करताना आपण कुठे जात आहोत. याबाबत सविस्तर माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. पद्मावती ते दत्तनगर तसे अंतर फार फार तर पाच किलोमीटर त्यासाठी फार तर ५० ते १०० रुपये एवढंच भाडे होते. मात्र, ३१०० रुपये म्हणजे हा त्या प्रवाशाला लुटण्याचा प्रकार त्या रिक्षा चालकाकडून झाला आहे. संबधित घटनेबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. संबधित प्रवाशी हा बंगरुळू येथे निघून गेल्याची माहिती दुकानदाराकडून देण्यात आली.
लटकेंच्या पत्नी विरोधात उमेदवार देऊन शिंदे ठाकरेंची अडचण करणार?