shivsena arjun khotkar accident, शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी निघालेल्या अर्जुन खोतकरांच्या ताफ्याला अपघात; १५ ते १६ वाहनांचा चुराडा – shivsena rebel leader arjun khotkar vehicles accident while going for the dussehra rally of chief minister eknath shinde group
औरंगाबाद : दौलताबाद येथील समृद्धी महमार्गावरून जात असताना शिंदे गटातील नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाला आहे. या अपघातात १५ ते १६ वाहनांचा चुराडा झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही, मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
शिवसेनेसाठी पक्षातील सर्वात मोठ्या बंडानंतरचा पहिला, तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा आहे. खरी शिवसेना कोणाची याचा निकाल निवडणूक आयोगाच्या दरबारात लागेलच, पण त्याआधी खऱ्या शिवसेनेची ताकद कोणामागे आहे ते दसरा मेळाव्याच्या माध्यमातून दाखवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर, तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडणार आहे. आपल्याच मेळाव्याला सर्वाधिक गर्दी जमावी यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार नियोजन करण्यात आले असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रक चालकाचं कारला वाचवताना नियंत्रण सुटलं, रिक्षाला चिरडलं, १० जणांचा मृत्यू ७ जण जखमी
याच दसरा मेळाव्यासाठी अर्जुन खोतकर हे आपल्या समर्थकांसह मुंबईकडे निघाले होते. मात्र दौलताबादजवळ आल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाला.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा यंदा बीकेसी येथे पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातून ३० हजारांहून अधिक बस येणार असल्याची चर्चा आहे. या बस उभ्या करण्यासाठी बीकेसीलगत असलेली मुंबई विद्यापीठाची जागा निश्चित करण्यात आली आहे.