Lady ST Conductor, Tik-Tok स्टार लेडी कंडक्टरवर एसटी महामंडळाची कारवाई, रोहित पवार म्हणाले, हेच खरे हिरो – ncp mla rohit pawar criticizes over suspension action against female conductor
मुंबई : ड्युटीवर असताना स्वत:चे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी उस्मानाबादमधील एका टिक टॉक स्टार महिला एसटी कंटक्टरवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाली असा ठपका या महिला कंडक्टरवर ठेवण्यात आला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ही कारवाई अयोग्य असल्याचे वाटत आहे. ट्विट करत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. (ncp mla rohit pawar)
या कारवाईचा विरोध करताना आमदार रोहित पवार म्हणाले की, अनेक ताणतणाव असूनही एसटी महामंडळाचे कर्मचारी दररोज लाखो प्रवाशांना विनाअपघात सेवा देतात. हेच एसटी महामंडळाचे कर्मचारी खरे हिरो आहेत. त्यातील एखादी मंगल पुरी ही भगिनी इंस्टास्टार होत असेल तर अशा कर्मचाऱ्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. पण त्याऐवजी तिला तडकाफडकी निलंबित करणं चुकीचं वाटतं. खाकी वर्दीत गाण्यावर धरला ताल; Tik-Tok स्टार लेडी कंडक्टरवर एसटी महामंडळाची मोठी कारवाई ‘चूक सुधारण्याची संधी द्यायला हवी होती’
एसटी महामंडळाचा जर गणवेशात रिल्स केल्याबाबत आक्षेप असेल तर संबंधित महिला कंटक्टरला ‘कारणे दाखवा’ नोटीस देऊन ही चूक सुधारण्याची संधी देता आली असती. पण त्याऐवजी थेट निलंबनाची कारवाई हा घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो. यात योग्य ती दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला द्याव्यात, अशी विनंती आमदार पवार यांनी एसटी महामंडळाला केली आहे.
जुन्नरमध्ये शरद पवारांचीच चर्चा, मोदींना शुभेच्छा देत जीवन संपविणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी दिली भेट मंगल सागर गिरी यांनी एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवनी देवीच्या गाण्यावर एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओ चांगलाच गाजला होता. त्याला लाखो व्ह्यूज आणि कमेंट आल्या होत्या. मात्र, गिरी यांच्या व्हिडिओवर एसटी महामंडळाने आक्षेप घेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. इतकेच नाही, तर मंगल गिरी यांचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
पुणे: मध्यरात्रीनंतर १ वाजता झाले स्फोट, असा पाडला चांदणी चौकातील पूल; पाहा व्हिडिओ मंगल सागर गिरी यांचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. त्यांच्या रिल्सला लाखो व्ह्यूज देखील मिळतात. वेगवेगळ्या गाणी आणि विविध विषयांवर मंगल सागर गिरी यांनी रिल्स बनवले आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर फेसबुक, इंस्टाग्रामवर अनेक लाइक्स व कमेंट आलेल्या आहेत.