मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या गुरु-शिष्याच्या नात्याची चर्चा राजकारणात अधूनमधून होत असते. या नात्यामागील गुपित शरद पवार यांनी अखेर उलगडून सांगितलं आहे. ( on guru-shishya relationship with PM )

वाचा:

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ”साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम, केंद्र सरकारच्या कारभाराची पद्धत आणि भारत-चीनच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं आहे.

करोनानंतरच्या लॉकडाऊनमुळं संपूर्ण देश आर्थिक अडचणीत सापडला आहे. राज्यांना याची सर्वाधिक झळ बसली आहे. अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारनेच राज्यांना मदत केली पाहिजे, अशी आग्रही भूमिका शरद पवार यांनी मांडली. त्यावर आपल्याला गुरू मानणाऱ्या मोदींना हे आपण का सांगत नाही असा प्रश्न राऊत यांनी विचारला. त्या प्रश्नाला पवार यांनी हसून उत्तर दिले. ‘मला मोदींचा गुरू म्हणून त्यांना आणि मला दोघांनाही अडचणीत आणू नका. राजकारणात कोणी कोणाचं गुरू असत नाही. आम्ही लोक अनेकदा एकमेकांच्या संदर्भात सोयीची भूमिका मांडत असतो,’ असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ‘अलीकडे काही माझी आणि त्यांची भेट झालेली नाही. करोनाचं संकट आल्यानंतर इतर पक्षांच्या नेत्यांप्रमाणे त्यांच्याशी बोललो असेन इतकेच. त्या पलीकडे नाही,’ असंही पवार यांनी सांगितलं.

वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच एका कार्यक्रमात शरद पवार हे माझे गुरू आहेत. त्यांचं बोट पकडूनच आम्ही राजकारण शिकलो, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात वेळोवेळी या नात्याची उजळणी होत असते. त्याच अनुषंगानं संजय राऊत यांनी पवारांना हा प्रश्न विचारला होता.

वाचा:

…तरच केंद्र सरकारचे दुकान चालेल!

‘केंद्र सरकारच्या उत्पन्नाचे सर्व मार्ग राज्यांतूनच जातात. राज्याची अर्थव्यवस्था, व्यवहार व उत्पादन वेगाने झाले तर संपत्ती निर्माण होईल आणि त्यातून त्याचा हिस्सा केंद्राला मिळेल हे साधं गणित आहे. त्यामुळं केंद्राला स्वत:चं दुकान चालवायचं असेल तर राज्यांची दुकानं आधी चालवली पाहिजेत,’ असं पवार म्हणाले. ‘केंद्राच्या तुलनेत राज्यांकडे कर्ज उभारण्याची क्षमता कमी असते. केंद्राकडे रिझर्व्ह बँक आहे. नोटा छापण्याचा अधिकार आहे. जागतिक बँक व आशियाई बँकेकडून कर्ज उभारण्याची क्षमता असते. त्यामुळं प्रसंगी आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज काढून राज्य स्थिरस्थावर करण्याची भूमिका केंद्रानं घेतली पाहिजे,’ अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here