Authored by किशोर पाटील | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 4, 2022, 8:23 PM

Jalgaon News : विजेच्या खांबावरील लाईट दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढलेला तरुणाचा विजेचा धक्का लागून तो खाली कोसळल्याने जखमी झाल्याची घटना घडली होती. या जखमी तरुणाचा आज मंगळवारी दुपारी ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

Jalgaon News
विजेच्या खांब्यावर चढला, शॉक लागल्याने खाली कोसळला; उपचारादरम्यान अनर्थ घडला…

हायलाइट्स:

  • विजेच्या धक्क्याने वीजेच्या खांब्यावरुन कोसळून गंभीर जखमी
  • तरुणाचा उपचारादरम्यान करुण अंत
  • जळगावमधील मोहाडी येथील घटना
जळगाव : जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात विजेच्या खांबावरील लाईट दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढलेला तरुणाचा विजेचा धक्का लागून तो खाली कोसळल्याने जखमी झाल्याची घटना घडली होती. या जखमी तरुणाचा आज मंगळवारी दुपारी ३ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. चंद्रकांत दत्तात्रय ठाकरे (वय-२३, रा. मोहाडी) असं मयत तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत ठाकरे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे वास्तव्यास होता. चंद्रकांत हा मोहाडी ग्रामपंचायत कार्यालयात पाणी पुरवठा विभागात नोकरीला होता. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता गावातील विजेचा खांब्यावरील लाईट बंद असल्याने चंद्रकांत खांब्यावर चढला.

शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी निघालेल्या अर्जुन खोतकरांच्या ताफ्याला अपघात; १५ ते १६ वाहनांचा चुराडा
बंद लाईट दुरुस्त करत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसून खाली कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली व त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लटकेंच्या पत्नी विरोधात उमेदवार देऊन शिंदे ठाकरेंची अडचण करणार?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here