श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये नेसलेल्या साड्या खरेदी करायच्यात? अशी आहे संधी – sridevis saree from movie english vinglish to be auctioned to celebrate film’s 10th anniversary
मुंबई: अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांचं वयाच्या ५५ व्या वर्षी दुबईत ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून त्यांनी मोठ्या पडद्यावर जोरदार कमबॅक केलं होतं. पण काही वर्षातच त्यांचं निधन झालं. या चित्रपटाला या वर्षी दहा वर्षे पूर्ण झाली. या निमित्तानं चित्रपटाची दिग्दर्शक गौरी शिंदे हिनं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
साड्यांचा लिलाव ‘इंग्लिश विंग्लिश’ हा श्रीदेवी यांच्या करिअरमधील तसंच त्यांच्या आयु्ष्यातील एक महत्त्वाचा चित्रपट ठरला होता. त्यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांची भूमिका गाजली, त्याच प्रमाणे त्यांच्या लुकची प्रचंड चर्चा झाली होती. या चित्रपटात त्यांनी नेसलेल्या साड्या ट्रेंडमध्ये आल्या होत्या. आता या साड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय गौरी शिंदे हिनं घेतला आहे.
सैफने पुन्हा केली तीच चूक; ‘तान्हाजी’त घडलेला प्रकार ‘आदिपुरुष’मध्ये सुधारण्यात अभिनेत्याला अपयश गौरी शिंदे म्हणाली की,’इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवींनी नेसलेल्या सर्व साड्या मी जपून ठेवल्या आहेत. आमच्या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाले. त्यामुळं या निमित्तानं मी या साड्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतलाय. हे माझ्या खूप वर्षांपासून डोक्यात होतं. आता निमित्तंही आलं आहे. यातून मिळणारी रक्कम ही मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असणाऱ्या एखाद्या संस्थेला देण्यात येईल, असंही तिनं सांगितलं.