दुबई: ४ ऑक्टोबर रोजी दुबईतील जबेल अली येथे पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन झाले. आज ५ ऑक्टोबरपासून भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येणार आहे. देशाचे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नहान बिन मुबारक अल नाहयान आणि UAE मधील भारताचे राजदूत संजय सुधीर प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. मंदिर प्रशासनाने याबाबतची माहिती दिली. सर्व धर्माच्या अनुयायांसाठी खुले असलेले हे मंदिर १ सप्टेंबर रोजी खुले करण्यात आले. मात्र त्याचे औपचारिक उद्घाटन बुधवारी झाले. यूएईमधले हे एकट्या समुदायाचं पहिले मंदिर आहे. हे मंदिर परंपरेचे प्रतीक आहे जे आगामी काळासाठी तयार करण्यात आलेले हे मंदिर परंपरेचे प्रतिक आहे, असे मंदिराकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. (Hindu Temple in Dubai)

१६ देव आणि गुरु ग्रंथ साहिब

UAE मधील भारताचे राजदूत संजय सुधरी म्हणाले की, दुबईतील मंदिर १६ हिंदू देवतांचे तसेच गुरु ग्रंथ साहिबचे पूजास्थान असेल. UAE चे सहिष्णुता आणि सहअस्तित्व मंत्री शेख नहान मुबारक अल नाहयान दसऱ्याला मंदिराचे उद्घाटन करतील. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस शिखांचे पवित्र गुरु ग्रंथ साहिबही येथे मंदिरात ठेवण्यात आले होते. मंदिर आतून खूप सुंदर आहे आणि त्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. मंदिराच्या मुख्य सभामंडपात देवाच्या मूर्ती बसवल्या आहेत.

या हॉलमध्ये एक मोठे 3D प्रिंटेड गुलाबी कमळ आहे जे सर्व घुमटावर दिसते. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे. हे मंदिर ‘पूजा गाव’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जबेल अली येथे आहे. याच ठिकाणी अनेक चर्च आणि गुरु नानक दरबार गुरुद्वारा आहेत. येथे व्यवस्थापनाद्वारे QR कोड आधारित अपॉइंटमेंट बुकिंग प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे. दुबईच्या हिंदू मंदिरातील लोकांनी वेबसाइटद्वारे या क्यूआर प्रणालीचा वापर करून हिंदू मंदिराला भेट दिली.

ना उम्र की सीमा हों…! ६० वर्षांनी लहान तरुणीशी ७८ वर्षीय वृद्धाचं लग्न
सहा दशकांपूर्वी पहिले मंदिर

दुबईमध्ये सुमारे ६४ वर्षांपूर्वी एक हिंदू मंदिर बांधण्यात आले होते. बुर दुबई येथील त्या मंदिरात भगवान शिव आणि कृष्णाची स्थापना करण्यात आली आहे. पण ते आतापर्यंत बांधलेले सर्वात मोठे मंदिर आहे. सन २०१२ मध्ये जबेल अलीमध्ये एक भव्य गुरुद्वारा बांधण्यात आला होता. मंदिर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर ७०,००० स्क्वेअर फूट क्षेत्रफळात पसरलेले असून ते दोन मजली आहे.

Hindu Temple in Dubai

दुबईत हिंदू मंदिर

पहिल्या मजल्यावर मोठे प्रार्थनागृह आहे. त्याच्या एका बाजूला लहान खोल्या बांधल्या आहेत. यांमध्ये १६ देव बसवले आहेत. त्याचबरोबर ब्रह्मदेवासाठी स्वतंत्र खोली आहे. पहिल्या मजल्यावर चार हजार चौरस फुटांचा हॉल आहे. या सभागृहात अनेक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे. यामध्ये श्रद्धांजली सभा, विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमांचा समावेश असेल.

उत्तर कोरियाने डागले क्षेपणास्त्र; जपान अलर्ट मोडवर, नागरिक सुरक्षित ठिकाणी, बुलेट ट्रेन सेवा बंद
भारतातून आले ब्राह्मण

येथे क्यूआर कोडमुळे प्रवेश काही प्रमाणात मर्यादित झाला आहे. गर्दीचे व्यवस्थापन आणि सामाजिक अंतर राखण्यासाठी ही प्रक्रिया अवलंबण्यात आली आहे. १४ ब्राह्मण खास भारतातून गेले असून त्यांना नामजपासाठी बोलावण्यात आले आहे. उद्घाटनासाठी UAE आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी आले होते. यासोबतच काही मुत्सद्दी आणि समाजाच्या नेत्यांनाही यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

५ ऑक्टोबरपासून हे मंदिर अधिकृतपणे सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे. सकाळी ६.३० ते रात्री ८ पर्यंत मंदिर खुले असते. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस मंदिरात दर्शनासाठी भेटीगाठी भरल्या आहेत. ५ ऑक्टोबरपासून, ज्यांनी वेबसाइटद्वारे बुकिंग केले आहे त्यांना अमर्यादित वेळेसाठी प्रवेश मिळू शकेल.

अफगाणिस्तान हादरलं, शाळेत भीषण स्फोट, ४६ मुलींसह ५३ जणांचा मृत्यू
सध्या दर्शन काही तासांवरच आहे. ऑक्‍टोबर अखेरपर्यंत ही बुकिंग प्रणाली सुरू राहणार असून त्यानंतर सभासदांना मोफत प्रवेश मिळेल. ते कधीही येऊन भेट देऊ शकतात. मंदिरात जाण्यासाठी भाविकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here