म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबईतील वेगवेगळ्या भागांतून तसेच मुंबईबाहेरून लाखो कार्यकर्ते आज, बुधवारी दसऱ्यानिमित्त मुंबईत दाखल होणार आहेत. सुमारे चार हजार बसेस आणि दहा हजार लहान मोठी खासगी वाहने येण्याची शक्यता असल्याने वाहतूककोंडी होऊ नये यासाठी दोन्ही ठिकाणच्या परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.

हे मार्ग बंद…
शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, राजवाडे चौक जंक्शन, दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, गडकरी चौक, दादासाहेब रेगे मार्ग, बालगोविंद दास मार्ग हे रस्ते ठरावीक अंतरासाठी वाहतुकीस बंद असतील. बीकेसी येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सी लिंककडून बीकेसी, कुर्लाच्या दिशेने फॅमिली कोर्ट जंक्शनकडून जाण्यास बंदी, संत ज्ञानेश्वर मार्गावरून इन्कम टॅक्स जंक्शनकडून पुढे, सुर्वे जंक्शन व रझाक जंक्शनवरून एमटीएनएल जंक्शन येथून, पूर्व द्रुतगती महामार्गावर चुनाभट्टी कनेक्टर ब्रिज हे मार्ग बीकेसीच्या दिशेने जाण्याकरिता बंद असतील.

शिवाजी पार्कसाठी पार्किंग व्यवस्था
दादरच्या शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यास पश्चिम व उत्तर उपनगरांतून बसमधून येणाऱ्या शिवसैनिकांसाठी सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम व कामगार मैदान परळ येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तर कार पार्किंगसाठी इंडिया बुल्स फायनान्स सेंटर, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर-१, कोहिनूर स्क्वेअर येथे व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून येणाऱ्या शिवसैनिकांच्या बसेसच्या पार्किंगसाठी पाच उद्यान माटुंगा, नाथालाल पारेख मार्ग, एडनवाला रोड, आर. ए. के. रोड येथे व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने ही व्यवस्था जाहीर केली आहे.

बीकेसी येथील पार्किंग व्यवस्था
फॅमिली कोर्टच्या मागील बाजू, कॅनरा बँकेजवळील पे अँड पार्क, पंजबा नॅशनल बँकेसमोरील मैदान, फटका मैदान, एमएमआरडीए कार्यालयासमोर आणि पाठीमागील जागा, जिओ गार्डनजवळ पे अँड पार्क, जिओ गार्डन तळमजला पार्किंग, वुई वर्क शेजरील मैदान, ओएनजीसी जवळील मैदान, सोमय्या कॉलेज, एमसीए क्लब पार्किंग, सीबीआय बिल्डिंग शेजारील मैदान, अंबानी संकुल शेजारील मैदान, युनिव्हर्सिटी मोकळा परिसर, ट्रेड सेंटर समोरील मोकळी जागा, डायमंड बोर्स, जे. एस. डब्ल्यू समोरील मोकळे मैदान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here