Dussehra Melava 2022 | दोन्ही सभा संध्याकाळी सुरू होणार असल्या तरी दुपारपासूच कार्यकर्ते दादर आणि बीकेसी भागात मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्यांना लागणारे बाटलीबंद पाणी, नाश्ता यांची सोय त्याच परिसरात व्हावी, यासाठी छोट्या व्यावसायिकांनी कंबर कसली आहे. गर्दीच्या पोटापाण्याची व्यवस्था करणारे शेकडो छोटे व्यावसायिक चांगली कमाई होण्याच्या अपेक्षेत आहे.

 

small traders Dasara
दसरा मेळावा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : दसऱ्याच्या दिवशी बीकेसी आणि शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. या संभाव्य लाखोंच्या सभेच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीच्या पोटापाण्याची व्यवस्था करणारे शेकडो छोटे व्यावसायिक चांगली कमाई होण्याच्या अपेक्षेत आहेत. शिवाय बाटलीबंद पाणी पुरवणाऱ्या कंपन्यांकडेही शेकडो बॉक्सची आगाऊ नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांसाठी यंदाचा दसरा ‘सोने’ लुटण्याची संधी देणारा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा वांद्रे कुर्ला संकुल येथे पार पडणार आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे. या दोन्ही ठिकाणी आज होणारी गर्दी लक्षात घेत मैदानाच्या परिसरात छोट्या दुकानदारांनी विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्याची तयारी पूर्ण केली आहे.

दोन्ही सभा संध्याकाळी सुरू होणार असल्या तरी दुपारपासूच कार्यकर्ते दादर आणि बीकेसी भागात मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्यांना लागणारे बाटलीबंद पाणी, नाश्ता यांची सोय त्याच परिसरात व्हावी, यासाठी छोट्या व्यावसायिकांनी कंबर कसली आहे.
राजकीय महामुकाबला! ठाकरे-शिंदे यांच्यातील संघर्षाचा आजच्या मेळाव्यात नवा अंक
बाटलीबंद पाण्याची विक्री

सर्वसामान्यपणे इतर दिवशी दादर परिसरात १०० बाटलीबंद पाण्याच्या बॉक्सची नोंद विक्रेत्यांकडून केली जाते. दसरा मेळाव्यानिमित्त यात १०० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. १२ ते २४ बाटली बंद पाणी एका बॉक्समध्ये असते. सभेच्या धर्तीवर २०० बॉक्स बाटली बंद पाण्याची नोंद झालेली आहे, असे दादर परिसरातील ऑक्सिकुल बाटली बंद पाण्याचे विक्री व्यवस्थापक (एएसएम) उमेश खामकर यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. सर्वसाधारणपणे १० रुपये किंमतीच्या लहान आणि २० रुपये किंमतीच्या मोठ्या बाटलीबंद पाण्याची विक्री मोठ्या प्रमाणात होते.
दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कुमक; सर्व जिल्ह्यांतून ५० हजार कार्यकर्ते
झटपट नाश्ता

सभेच्या परिसरात खाण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी ताज्या पदार्थांच्या स्टॉल्सनी तयारी केली आहे. नाश्त्यासाठी वडापाव, सँडविच अशा झटपट तयार होणाऱ्या पदार्थांची चलती असते. यामुळे बटाटावडे तयार करून ग्राहक आल्यानंतर काही मिनिटांत तळून गरमागरम दिले जातात, असे शिवाजी पार्क परिसरातील किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय चहाची विक्री करणाऱ्यांनीही तयारी केली असून आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर कमाई होईल अशी अपेक्षा स्टॉलधारकांनी व्यक्त केली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here