शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगात कायदेशीर लढा सुरू आहे. दुसरी लढा जमिनीवर सुरू आहे. त्यादृष्टीनं शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या वाटचालीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

 

shinde vanity
मुंबई: शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगात कायदेशीर लढा सुरू आहे. दुसरी लढा जमिनीवर सुरू आहे. त्यादृष्टीनं शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. दसरा मेळाव्याला शिवसेनेच्या वाटचालीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसऱ्याला दोन मेळावे होत आहेत. या दोन्ही मेळाव्यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. कोणाचा मेळावा अधिक भव्यदिव्य होणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यासाठी दोन्ही गटांनी मेळाव्यासाठी ताकद लावली आहे.

एकनाथ शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी जोरदार प्रयत्न केले. प्रकरण मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेलं. निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूनं लागला. त्यानंतर शिंदे गटानं बीकेसी मैदानात दसरा मेळाव्याची तयारी सुरू केली. शिंदे गटातील बहुतांश आमदार ग्रामीण भागातील आहे. या आमदारांवर कार्यकर्त्यांना आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी १७०० एसटी बसेस बूक करण्यात आल्या आहेत. एसटी बसेससाठी शिंदे गटानं १० कोटी रुपये रोख मोजले आहेत.
Shivsena: कमळाबाईची अशी जिरवू की, भाजप पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून नष्ट होईल: शिवसेना
बीकेसीमध्ये एक व्हॅनिटी व्हॅन मागवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी ही व्हॅनिटी व्हॅन मागवण्यात आली आहे. व्यासपीठाच्या मागेच व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये आरामदायी सोफा आहे. विश्रांती घेण्यासाठी बेड आहे. बैठक घेण्यासाठी व्यवस्था आहे. ड्रेसिंग टेबलची सुविधा आहे. व्यासपीठावर येण्यापूर्वी शिंदे या व्हॅनिटीमध्ये थांबतील अशी माहिती आहे.
Dasara Melava: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यापूर्वी रंगली ‘त्या’ दोन तलवारींची चर्चा
दुसरीकडे शिवाजी पार्क मैदानावरही दोन व्हॅनिटी पार्क करण्यात आल्या आहेत. एक व्हॅनिटी ठाकरे कुटुंबासाठी आणण्यात आली आहे. तर दुसऱ्या व्हॅनिटीत पक्षातील वरिष्ठ नेते थांबतील. या व्हॅनिटी व्हॅन्समध्येही सोफा, बेड, ड्रेसिंग टेबलची व्यवस्था आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here