मुंबई : शेअर बाजारात सध्या चढ-उताराचे वातावरण आहे. याचा फटका फक्त सर्व सामान्य गुंतवणूकदारांनाच नाही तर मोठ-मोठया व्यापारी, उद्योगपतींनाही होत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आणि भारत व आशियातील अतिश्रीमंत गौतम अदानी आहेत. जगातील श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्कचे नंबर १ चे सिंहासन कायम असले तरी अदानींपासून नंबर दोनची खुर्ची आता आणखी दुरावली आहे.

मामाच्या एका टोमण्यामुळे बदलले अदानींचे जीवन, जगातील तिसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले

अदानींना क्रमवारीत ‘जोर का झटका’
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार अदानी आता फ्रांसच्या बर्नार्ड अर्नॉल्टच्या तुलनेत खूप मागे पडले आहेत. आता तिसऱ्या क्रमांकावर असलेले बर्नार्ड अर्नॉल्ट आणि चौथ्या क्रमांकावरील गौतम अदानी यांच्यात सुमार १६ अब्जा डॉलरचे अंतर आहे. बर्नार्डची एकूण संपत्ती आता १४१ अब्ज डॉलर आहे. तर दुसरीकडे, मंगळवारी ४.९ अब्ज डॉलरची कमाई करूनही अदानीची एकूण संपत्ती १२५ अब्ज डॉलर इतकी आहे.

काही दिवसांपूर्वी अदानी १५० अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसर्‍या स्थानावर पोहोचले होते, पण भूतकाळात त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा त्यांना मोठा धक्का बसला आणि आता जगातील दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीचे स्थान त्यांच्यापासून दुरावले आहे. याशिवाय जेफ बेझोस सध्या १४४ अब्ज डॉलर्ससह अब्जाधीश नंबर २ आहे. तर इलॉन मस्क २२८ अब्ज डॉलर्ससह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत.

भारताशी पंगा महागात पडणार; चीन लवकरच एकाकी पडणार, वाचा काय होणार आहे
१० श्रीमंतांच्या संपत्तीत ४३ अब्ज डॉलरची वाढ
मंगळवारी जगभरातील शेअर बाजारात उसळलेल्या तेजीच्या वादळामुळे प्रदीर्घ काळानंतर टॉप-१० अब्जाधीशांच्या संपत्तीत सुमारे ४३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. त्यापैकी बर्नार्ड अर्नॉल्ट यांची संपत्ती सर्वाधिक वाढवली. त्यांनी एका दिवसात तब्बल १०.५ अब्ज डॉलर्सची कमाई केली. यानंतर जेफ बेझोस यांनी ५.३६ अब्ज डॉलर आणि एलॉन मस्क यांनी ५.५३ अब्ज डॉलरची कमाई केली.

अंबानी-अदानींमध्ये विशेष करार, दोन्ही कंपन्यांचे कर्मचारी ‘अडकणार’; पाह नेमकं काय घडलं
या यादीत बिलगेट्स १११ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर कायम असून मंगळवारी त्यांची संपत्ती ३.२ अब्ज डॉलरने वाढली. तसेच वॉरन बफेची संपत्ती २.६६ अब्ज डॉलर्सने वाढून ९८.२ डॉलर बिलियन झाली आहे आणि आता ते सहाव्या स्थानावर आहे. लॅरी पेजच्या संपत्तीमध्ये २.४८ डॉलर अब्जची वाढ झाली आहे आणि ती आता ९३.६ डॉलर बिलियनसह सातव्या स्थानावर आहे.

आठव्या क्रमांकावर असलेल्या सर्जी ब्रिनची संपत्ती २.३८ अब्ज डॉलरने वाढून ८९.६ बिलियन डॉलर झाली आहे. नवव्या स्थानावर स्टीव्ह बाल्मर आहे, ज्यांची एकूण संपत्ती २.६७ डॉलर अब्जने वाढली आहे आणि आता ते ८८.४ डॉलर बिलियनसह ९व्या क्रमणकवर आहेत. दहाव्या स्थानावर मुकेश अंबानी ८३.७ डॉलर अब्ज आहेत, तर मंगळवारी त्यांच्या संपत्तीत १.८८ डॉलर बिलियनची वाढ झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here