नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संघाच्या मुख्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री संतोष यादव उपस्थित होत्या. संघाच्या विजयादशमी सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून महिलेला निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यामुळे संघाच्या दृष्टीकोनातून हा सोहळा ऐतिहासिक ठरला आहे.

आपण कोण आहोत, आपला आत्मा काय याची स्पष्ट माहिती आपल्याला असायला हवी. तसं असल्यास आपल्याला प्रगतीचा मार्ग अगदी स्पष्ट दिसतो, असं प्रतिपादन सरसंघचालक यांनी केलं. लोकसंख्येच्या बाबतीत एक व्यापक धोरण लागू करायला हवं. यातून कोणालाच सूट मिळू नये. आपल्या देशातील तरुणांची संख्या ७० कोटींहून अधिक आहे. आपली लोकसंख्या वाढतेय असं चीनच्या लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी पावलं उचलली. आपल्या समाजालाही जागरुक व्हायला हवं. नोकरी-चाकरीत एकटं सरकार आणि प्रशान किती रोजगार वाढवणार? समाजानं दुर्लक्ष केल्यावर अशी परिस्थिती निर्माण होते, असं भागवत म्हणाले. भागवत यांनी त्यांच्या भाषणातून कायद्यासाठी बॅटिंग केल्याची चर्चा आहे.

समाजात समानता असायला हवी आणि सर्वांना सन्मान मिळायला हवा. हा घोड्यावर चढू शकतो, तो घोड्यावर चढू शकत नाही, असा मूर्खपणा बंद करायला हवा. सगळ्यांनी एकमेकांचा सन्मान करायला हवा. केवळ स्वत:चा विचार बंद करायला हवा. आपल्याला समाजाचा विचार करायला हवा. करोना काळात समाज आणि सरकारनं एकजूट दाखवली. ज्यांची नोकरी गेली, त्यांना काम मिळालं. आरएसएसनंही रोजगार देण्यात मदत केली. उपचार आजारांनंतर केले जातात. सरकारनं आजार टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं भागवत यांनी म्हटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here