नवी दिल्ली: राजस्थानतील राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री () आपल्या समर्थक आमदारांसह दिल्लीत पोहोचले आहेत. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार सचिन पायलट हे काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेणार आहेत. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. भारतीय जनता पक्ष आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी केला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांना राजस्थानातील राजकीय परिस्थितीची संपूर्ण कल्पना देण्यात आलेली आहे. आम्ही राजस्थानातील परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असून येथे मध्य प्रदेशासारखी स्थिती येऊ देणार नाही, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने माहिती देताना सांगितले आहे. सोनिया गांधी यांनी देखील या परिस्थितीची गांभिर्याने दखल घेतली आहे.

एसओजीच्या तपासात ३ अपक्ष आमदार भ्रष्टाचार विरोधी ब्यूरोपर्यंत पोहोचल्यानंतर राजस्थानात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे दिल्लीत असून पक्षश्रेष्ठींना भेटून ते राजस्थानातील परिस्थितीवर मार्ग काढण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सचिन पायलट यांच्यासोबत एकूण किती आमदार आहेत, याबाबत समजू शकलेले नाही. मात्र, काल शनिवारी एकूण ३ आमदार सचिन पायलट यांची भेट घेण्यासाठी जयपूरला पोहोचले होते.

तर, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा निशाणा उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यावर असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राजस्थानचे अध्यक्ष सतीश पुनिया यांनी केला आहे. काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याचेच यावरून स्पष्ट होत असल्याचे पुनिया म्हणाले. भांडण त्यांचे असून त्याच्याशी आमचे काही देणे-घेणे नसल्याचेही पुनिया म्हणाले. आम्ही तर काँग्रेसच्या या खेळाचे दर्शक असून आमच्यावर ते चुकीचे आरोप करत आहेत, असे पुनिया म्हणाले.

वाचा:

भारतीय जनता पक्ष आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे- गहलोत

भारतीय जनता पक्ष राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाडण्याचे प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप राजस्थानच्या काँग्रेसच्या सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. सरकार पाडण्यासाठी भाजपकडून आमदारांचा घोडेबाजार सुरू आहे, असा थेट आरोपही गहलोत यांनी केला आहे. सरकार पाडण्यासाठी भाजप कट कारस्थान करत असून त्यासाठी आमदारांना २५-२५ कोटींची ऑफर देण्यात येत आहे, असा गंभीर आरोप गहलोत यांनी केलाय.

वाचा: वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here