मुंबई : देशभरात विजयादशमी, दसऱ्याचा सण साजरा होत असताना सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी इच्छूक असणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. देशात दसऱ्याच्या उत्साहात आज, बुधवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आता रु. ४७,३५९ वर आहे, जी एका दिवसापूर्वी म्हणजेच मंगळवारी ४७,८५० रुपये होती. दुसरीकडे, ८ ग्रॅम २२ कॅरेट सोनं रु. ३७,८८० रुपयांनी उपलब्ध आहे, जे मंगळवारी रु. ३७,४८० वरून वाढला आहे.

सणासुदीत सोनं घ्यायचा विचार करताय! जाणून घ्या गुंतवणुकीचे विविध प्रकार… मिळवा फायदा
२४ कॅरेट सोन्याच्या किमतीतही आदल्या दिवशीच्या तुलनेत वाढ झाली आहे. Goodreturns नुसार आज १० ग्रॅम आणि ८ ग्रॅम २४ कॅरेटचं सोनं किंमत अनुक्रमे रु. ५१,६६० आणि रु. ४१,३२८ आहे, जे अनुक्रमे रु. ५५० आणि रु. ४४० ने वाढले आहे. दरम्यान सोनं खरेदीसाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांनी लक्षात घ्या की वर नमूद केलेले दर, वस्तू आणि सेवा कर (GST), स्रोतावर जमा केलेले कर (TCS) आणि इतर शुल्काशिवाय आहेत. त्यामुळे अचूक दरासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक सोनार/ज्वेलरशी संपर्क साधू शकता.

सोनं खरेदीची संधी! BSE मधूनही करता येणार सोन्याचा व्यवहार, जाणून घ्या कसा घ्याल फायदा
खाली नमूद केलेली यादी भारतातील विविध शहरांमध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे आणि २४ कॅरेट सोन्याच्या दिवसासाठीच्या सोन्याच्या किमतींबाबत आहे. खालील डेटा Goodreturns या प्लॅटफॉर्मवरून संकलित केला गेला आहे. याव्यतिरिक्त, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यास भारतात सोने महाग होते. आंतरराष्ट्रीय घटकांमध्ये अस्थिर धोरणे, मंदावलेली आर्थिक वाढ आणि अमेरिकन डॉलरची ताकद यांचा समावेश होतो.

गोल्ड-सिल्वर हॉलमार्किंग; सोने-चांदीचे दागिने खरेदी करणे आणखी महागले, जाणून घ्या नवीन दर
आज चांदीची किंमत किती आहे?
दरम्यान, चांदीही कालच्या तुलनेत महागली आहे. गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार प्रति १० ग्रॅम चांदी रु. ६१८ आणि प्रति १०० ग्रॅम, रु. ६,१८० रुपयात उपलब्ध आहे.

प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीचे भाव
दिल्लीत 2 कॅरेट सोन्याची किंमत रु. ४७,५०० प्रति ग्रॅम आहे, तर बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई (त्या क्रमाने) रु. ४७,४००, रु. ४७,७५०, आणि रु. ४७,५५० आहे. दुसरीकडे, दिल्ली, कोलकाता आणि मुंबई येथे चांदीची किंमत रु. ६१८ प्रति १० ग्रॅम आहे, तर बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादचे रहिवासी रु. ६६७ मध्ये समान प्रमाणात चांदी खरेदी करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here