आलिशान निवासी प्रकल्प
सुमारे प्रति चौरस फूट ९० हजार रुपयांना हा व्यवहार झाला आहे. हा या वर्षातील सर्वात महागडा व्यवहार आहे. माधुरीचे हे घर टॉवर सी मध्ये ५३ व्या मजल्यावर असून ते ५,३८४ स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. अनेक व्यावसायिक आणि उद्योजकांनी इंडियाबुल्स ब्लूमध्ये अपार्टमेंट्सही खरेदी केले आहेत. १० एकरमध्ये पसरलेल्या या आलिशान निवासी प्रकल्पाचे १०० कोटी रुपयांपर्यंतचे व्यवहार झाले आहेत. माधुरीच्या लक्झरी अपार्टमेंटची २८ सप्टेंबर रोजी नोंदणी झाली आणि तिने त्यावर २.४ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले. महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियमांनुसार महिलांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सूट मिळते. या अपार्टमेंटसह माधुरीला कारसाठी सात पार्किंग स्लॉट देण्यात आला आहे.
अपार्टमेंट भाडेतत्त्वावर
माधुरीने गेल्या वर्षी याच प्रकल्पात २९व्या मजल्यावर ५,५०० स्क्वेअर फूटचे एक अपार्टमेंट भाडेतत्त्वावर घेतले होते. हे अपार्टमेंट ३६ महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर घेतले होते. दीक्षित-नेने कुटुंबीयांनी या अपार्टमेंटच्या आतील बाजूचे कामही सुरू केले होते. या सदनिकेचे भाडे सुरू राहणार की रद्द करण्यात आले हे स्पष्ट नाही.
६१ कोटींचे घर
गेल्या महिन्यात फार्मास्युटिकल कंपनी एरिस लाइफसायन्सेसचे अध्यक्ष आणि एमडी अमित बक्षी यांनी वरळीच्या ३ सिक्स्टी वेस्ट प्रकल्पात ६१ कोटी रुपयांचे घर विकत घेतले. ३०व्या मजल्यावर असलेल्या या अपार्टमेंटचा सौदा ९४,५०० रुपये प्रति चौरस फूट दराने झाला होता. महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मुंबईत मुद्रांक शुल्कात सूट दिली होती. ही सूट ३१ मार्च २०२१ पर्यंत देण्यात आली होती. या काळात शहरातील मालमत्तांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे.