rajasthan air force jawan suicide: राजस्थानात हवाई दलाच्या जवानानं आत्महत्या केली आहे. जम्मूमध्ये तैनात असलेला जवान सुट्टीवर आला होता. आत्महत्येआधी त्यानं एक चिठ्ठी लिहिली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

मंगळवारी निर्मलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. निर्मलच्या आत्महत्येला त्याची पत्नी आणि सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोप निर्मलच्या कुटुंबियांनी केला. २०१९ मध्ये निर्मलचा विवाह शिवगंज येथील हेमलताशी झाला. ती निर्मलसोबत जम्मूमध्ये राहायची. महिन्याभरापूर्वी निर्मलनं हेमलताला माहेरी सोडलं. हेमलता आणि तिच्या घरचे निर्मलला मानसिक त्रास देत होते. त्यामुळेच निर्मलनं आत्महत्या केली, असा आरोप निर्मलच्या कुटुंबियांनी केला.
निर्मल कुमारनं ५० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सुसाईड नोट लिहिली आहे. ‘हवाई दलाच्या नोकरीत सन्मान असतो. त्यामुळे मी आनंदात आहे. आत्महत्या करण्यासाठी मी एक दिवसाची सुट्टी घेऊन घरी आलो होतो. माझ्या अधिकाऱ्यांना मला सर्पदंश झाला. त्यांना आत्महत्या केल्याचं सांगू नका. माझ्या निधनानंतर सासरच्या लोकांपैकी कोणालाच बोलवू नका. माझ्या बँक खात्यात बरेचे पैसे आहेत. गरज पडल्यास ते काढा,’ असं निर्मलनं चिठ्ठीत नमूद केलं आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.