Authored by Sonali Deshpande | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Oct 5, 2022, 12:53 PM

Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षितनं नवं घर खरेदी केलं. त्याची किंमत आहे ४८ कोटी रुपये. सर्वात महागडं असं हे घर आहे. नुकतेच या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

 

Madhuri Dixit

हायलाइट्स:

  • माधुरी दीक्षितनं घेतलं आलिशान घर
  • वरळीमध्ये ४८ कोटींना घेतलं घर
  • घराचे फोटो झाले व्हायरल
मुंबई : बाॅलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितनं मुंबईत वरळीमध्ये एक आलिशान घर खरेदी केलं आहे. सध्या या घराबद्दल खूप चर्चा सुरू आहे. माधुरी आणि डाॅ. श्रीराम लेले यांनी हे घर सुपर प्रीमियम रेजिडेंशियल प्रोजेक्ट इंडियाबुल्स ब्लू इथे खरेदी केलं आहे. हे घर म्हणजे अगदी स्वप्नवतच आहे. घरातून समुद्राचा नजारा दिसतो.

दिल्लीत प्रभासच का करणार रावण दहन? मुख्यमंत्रीही असतील उपस्थित

माधुरी दीक्षितनं हे घर ४८ कोटी रुपयांना खरेदी केलंय. प्रति स्क्वेअर फूट या घराची किंमत ९० हजार रुपये आहे. या वर्षातला हा सर्वात महागडा व्यवहार मानला जातोय. ही एरिया पाॅश समजली जाते. इथे सगळ्या सुख-सोयी आहेत.

माधुरीचं घर

नव्या घराचा एरिया आणि कार पार्किंग
माधुरी दीक्षितचं हे नवं घर ५,३८४ स्क्वेअर फूट आहे. इंडियाबुल्स ब्लू या टाॅवरमध्ये ५३ व्या मजल्यावर हा राजमहल आहे. घराबरोबर सात कार्ससाठीचं पार्किंग आहे.

माधुरीचं घर

याच सोसायटीत दर महिना १२ लाख रुपये भाडं देऊन माधुरी रहात होती
काही दिवसांपूर्वी माधुरीनं याच टाॅवरमध्ये भाड्यावर घर घेतलं होतं. त्याचं भाडं दर महिना १२ लाख रुपये होतं. ते साडे पात हजार स्क्वेअर फीट होतं. अपूर्वा श्राॅफनं ते डिझाइन केलं होतं.

माधुरीचं सुंदर घर

माधुरीच्या घरातला हाॅल


हरियाणात होतं माधुरीचं घर

माधुरी दीक्षितचं एक घर हरियाणात होतं. २०१९ मध्ये तिनं ते विकलं. ते घर ३.२५ कोटी रुपयांना विकलं गेलं. १९९६ मध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांनी मुख्यमंत्री कोट्यातून हे घर दिलं होतं.

माधुरी आणि डाॅ. नेने

झलक दिखला जा १० शोसाठी माधुरीची फी
माधुरीच्या डाॅक्टर पतीकडे अनेक लग्झरी कार्स आहेत. खूप संपत्तीही आहे. माधुरी एका सिनेमासाठी ४ ते ५ कोटी रुपये घेते आणि रिअॅलिटी शोसाठी २५ कोटी रुपये. सध्या ती झलक दिखला जा १० शो जज करते. ती प्रत्येक एपिसोडसाठी ३० लाख रुपये घेते.

राधिका आपटेने शेअर केला फोटो लोकांना दिसले हातावरचे केस

काजोल, रानी, जया बच्चन आणि रणबीरसह अनेक कलाकारांची दुर्गापूजेला हजेरी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here