पौढी : उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री उशिरा एक बस ५०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात आत्तापर्यंत २५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रात्री करण्यात आलेल्या बचाव मोहिमेत आत्तापर्यंत २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ज्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हरिद्वार जिल्ह्यातील लालधंग येथील काटेवाड गावातून कांडा तल्लाला जाणारी बस लॅन्सडाउनच्या सिमडी गावाजवळ सुमारे ५०० मीटर खोल दरीत कोसळली. ही बस वऱ्हाड्यांसह हरिद्वारमधील लालधंग येथून कारागावकडे जात होती. सिमडी गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली.

सामना सुरु असतानाच रोहित शर्माने जोडले हात; रडायला आला, पाहा असं घडलं तरी काय…
आत्तापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसमध्ये सुमारे ४५ जण होते. पट्टा तुटल्यामुळे बसचे नियंत्रण सुटले आणि दरीत कोसळ्याचं सांगण्यात येत आहे. घटना दुपारी ४ वाजताची आहे. एसडीआरएफ आणि ग्रामस्ठांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरु आहे. रात्र झाल्यामुळ बचाव कार्यात अडचण आली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य केले. अंधारामुळे मोबाईल टॉर्चने मृतदेह आणि जखमींचा शोध घेण्यात आला.

बिरोंखाल आरोग्य केंद्रातील पाच डॉक्टरांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. दोन लहान मुलांसह सहा जखमींना बिरखल आरोग्य केंद्रात तर एका जखमीला कोटद्वार रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

MaTa Superwoman : आधी सत्यवानाची सावित्री झाली नंतर महाराष्ट्राची ठरली पोशिंदा;

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here