नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी १२० बसेस बुक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी बसच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. एसटी बसच्या फेऱ्या रद्द झाल्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत असल्याचं चित्र दिसून येत आहे. नंदुरबार बस आगारातून सुटणाऱ्या अनेक बस फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना ऐन सणासुदीच्या दिवशी बसची वाट पाहत तात्काळत बसावे लागत आहे. तर दुसरीकडे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून अचानक भाडेवाढ करण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

काल नंदुरबार येथून मुंबईकडे दसरा मेळाव्यासाठी जवळ पास सात हजार शिंदे गटातील कार्यकर्ते रवाना झाले आहेत. मुंबई येथील बिकेसी मैदानावर शिंदे गटाच्या दसऱ्या मेळाव्यासाठी काल सायंकाळी नंदुरबार येथून १२० बसेस मुंबई कडे रवाना झाल्या. मात्र, जिल्ह्यातील बस स्थानकांवर प्रवाशांना बसेसची गैरसोय होतांनाचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सामना सुरु असतानाच रोहित शर्माने जोडले हात; रडायला आला, पाहा असं घडलं तरी काय…
शिंदे गटाच्या किती बस बुक?

शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून खासगी ३ हजार बसेस बुक करण्यात आलेल्या आहेत. शिंदे गटाने आतापर्यंत १८०० एसटी बस बुक केल्या असल्याची नोंद आहे. यासाठी तब्बल १० कोटी रुपये रोख भरले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सोमवारी सायंकाळी ५ पर्यंत १८०० एसटी गाड्यांचे आरक्षण केले होते. तीन हजार खासगी गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण पूर्ण झाले आहे. बांद्रा कुर्ला संकुलात सभा होत असल्याने लाख-दीड लाख लोकांची गर्दी अपेक्षित आहे. ही गर्दी जमविण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी गेली १५ दिवस जिल्हा-तालुका पिंजून काढला आहे. प्रत्येक शिवसैनिकाची मुंबईत येण्यापासून राहण्या-खाण्यापर्यंतची व्यवस्था होईल, अशी तयारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ठाकरेंच्या मेळाव्याचं नियोजन कसं आहे?

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १४०० खासगी बस आरक्षित केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील शिवसेनेच्या शाखाप्रमुख, नगरसेवक यांना स्वखर्चाने कार्यकर्ते सभास्थळी येण्याच्या सूचना आहेत. कसारा, कर्जत, खोपोली, पालघर, विरार, डहाणू रोड येथून येणाऱ्या मिनी बस, टेम्पो ट्रॅव्हलर, सात आसनी कार अशा वाहनांची संख्यादेखील हजारोंच्या संख्येत असेल. दोन्ही सभांसाठी एकूण जवळपास दहा हजार वाहनांतून कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे, असे राज्यातील खासगी बसचालक-मालकांकडून सांगण्यात आले.

MaTa Superwoman : आधी सत्यवानाची सावित्री झाली नंतर महाराष्ट्राची ठरली पोशिंदा;

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here