रायगड: जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये रविवारी मृतावस्थेत आढळून आलेले जवान राहुल भगत यांच्या मृत्यूबद्दल केल्या जाणाऱ्या दाव्यांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. राहुल भगत बारामुल्लातील लष्करी तळावर मृत स्थितीत आढळून आले. त्यांच्या शरीरावर बुलेटच्या जखमा होत्या. ते शहीद झाल्याची बातमी सुरुवातीला समोर आली. मात्र आता लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

भगत यांना वीरमरण आल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली. संरक्षण दलातील अधिकाऱ्यांनी मात्र त्याचा इन्कार केला. ‘जवानाच्या मृत्यूवर आम्ही भाष्य करणार नाही. मात्र तो जवान शहीद झालेला नाही,’ असं लष्कराचे जनसंपर्क अधिकारी एमरॉन मुसावी यांनी सांगितलं. या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
बटण दाबलं, दार उघडलं, पण लिफ्ट आली नाही; ११ व्या मजल्यावरून पडून तरुणाचा करुण अंत
राहुल भगत २०१५ मध्ये लष्करात रुजू झाले. १३ राष्ट्रीय रायफलमध्ये ते सेवा बजावत होते. ते महाड तालुक्याचे रहिवासी होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन वर्षांचा मुलगा, आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. राहुल यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर त्यांच्या गावातील गरबा रद्द करण्यात आला. स्थानिक आमदार भरत गोगावलेंनी राहुल भगत यांचा फोटो असलेला बॅनर लावला. त्यातही शहीद झाल्याचा उल्लेख होता.
मोबाईलवर गाणी लावली, पत्नीसोबत ठेका धरला; फ्लॅटमध्ये गरबा खेळता खेळता तरुणाचा मृत्यू
राहुल भगत यांच्या निधनाचं वृत्त आल्यावर दोन तालुक्यांतील लोकांनी दु:ख व्यक्त केलं. त्यांना श्रद्धांजली वाहिली. अनेकांनी श्रद्धांजलीचे बॅनर लावले, अशी माहिती स्थानिक शैलेश पालकर यांनी दिली. रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माध्यमांनी भगत यांच्या वीरमरणाचं वृत्त दिलं होतं. मात्र आता या प्रकरणात लष्करानं वेगळीच माहिती दिल्यानं स्थानिक संभ्रमात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here