Maharashtra Politics | येत्या ३ नोव्हेंबर रोजी मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग (Election Commission) धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला सुरू असताना, घटनापीठाने धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आला आहे.

हायलाइट्स:
- १४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत
- शिवसेनेच्या चिन्हाबाबत लवकरच फैसला होणार
येत्या ३ नोव्हेंबर रोजी मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा खटला सुरू असताना, घटनापीठाने धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार आता घडामोडींना वेग आला आहे. न्यायालयाच्या निर्देशांनंतर आता निवडणूक आयोगही कामाला लागला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात होणार आहे. १४ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाचा, याचा फैसला झाल्यास अंधेरी पोटनिवडणुकीची राजकीय समीकरणे ३६० अंशांमध्ये बदलू शकतात.
शिवसेनेचे काही निवडक पदाधिकारी सर्व कागदपत्रे घेऊन दिल्लीत दाखल झाले असून त्यांच्याकडून आयोगापुढे बाजू मांडण्यात येणार आहे. कोणते मुद्दे मांडायचे, नेमकी भूमिका काय असावी यासाठी हे पदाधिकारी सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे समजते. तर शिंदे गटाचे नेतेही सध्या कायदेतज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे कोणते महत्त्वाचे पुरावे सादर केले जाणार, हे पाहावे लागेल.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.