Maharashtra Politics | आतापर्यंत राज्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्यावेळी पंकजा मुंडे यांचे नाव सातत्याने चर्चेत होते. परंतु, भाजपने पंकजा मुंडे यांना एकदाही उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने रंगत होत्या. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात अतिश्य स्पष्टपणे भाष्य केले. ता २०२४ ची निवडणूक वगळता कोणत्याही निवडणूक किंवा पदासाठी मी इच्छूक नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.

 

Pankaja Munde Dasara Melava
भगवानगड दसरा मेळावा

हायलाइट्स:

  • व्यक्ती नव्हे संघटना श्रेष्ठ असते
  • आता चर्चा थांबवा २०२४ च्या तयारीला लागा
बीड: भाजपमध्ये व्यक्ती नव्हे तर संघटना श्रेष्ठ असते. हा विचार मला पूर्णपणे मान्य आहे. भाजपमधील प्रत्येकाला हा नियम लागू आहे. त्यामुळे आता भाजपमधील कोणत्याही निवडणुकीसाठी किंवा पदासाठी माझ्या नावाचा आग्रह धरू नका. या सर्व चर्चांना पूर्णविराम देऊन २०२४ मधील निवडणुकीच्या तयारीला लागा. आता आपल्याला पक्षासाठी समर्पणाच्या वृत्तीने आणि झोकून देऊन काम करायचे आहे, असे वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे यांनी केले. त्या बुधवारी भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यात बोलत होत्या.
धनंजय मुंडे म्हणाले, आमच्यातलं बहीण भावाचं नातं संपलं; पंकजा म्हणतात, ‘माझ्यासाठी…’
काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांचे एक वक्तव्य प्रचंड गाजले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकारणातून घराणेशाही हद्दपार करायची आहे. मीदेखील घराणेशाहीचे प्रतिक आहे. पण मोदींनी ठरवले तरी जनता माझा पराभव होऊ देणार नाही, अशा आशायचे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यामुळे बऱ्याच काळापासून महाराष्ट्र भाजपमध्ये काहीशा बाजूला सारल्या गेलेल्या पंकजा मुंडे आगामी काळात आक्रमक होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, भगवानगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे या पूर्णपणे नरमल्याचे दिसून आले. आतापर्यंत राज्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांच्यावेळी पंकजा मुंडे यांचे नाव सातत्याने चर्चेत होते. परंतु, भाजपने पंकजा मुंडे यांना एकदाही उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने रंगत होत्या. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात अतिश्य स्पष्टपणे भाष्य केले. आता २०२४ ची निवडणूक वगळता कोणत्याही निवडणूक किंवा पदासाठी मी इच्छूक नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
सध्या मी बेरोजगारच, पंकजांच्या कानपिचक्या, शेवटी म्हणाल्या, एक तीर में दो शिकार
यावेळी पंकजा मुंडे यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून आपल्या मनातील सल जरुर बोलून दाखवली. ‘माना की औरो के मुकाबले कुछ पाया नही मैने, पर खुद को गिरा के कुछ उठाया नही मैने’, ‘जरुरत से जादा इमानदार हू मै, इसलिए सबके नजरो मे गुन्हेगार हु मै’ असे शेर बोलून दाखवत पंकजा यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. मात्र, दुसऱ्या बाजूला आपण बंडाची तलवार पूर्णपणे म्यान केल्याचे स्पष्ट संकेतही पंकजा यांनी दिले. तसेच आता आपले एकमेव लक्ष्य हे २०२४ सालची परळी विधानसभेची निवडणूक असल्याचेही पंकजा यांनी सांगितले. २०२४ मध्ये पक्षाने मला परळी मतदारसंघातून तिकीट दिले तर मी काम करेल. आता मला पक्षाला आणि कोणत्याही नेत्याला त्रास द्यायचा नाही. आता आपण केवळ समर्पणाच्या भावनेतून काम करायचे आहे. २०२४ मध्ये आपण आपली ताकद दाखवून देऊ, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here